Palghar Java Plum Agrowon
ॲग्रो विशेष

Palghar Java Plum : पालघरच्या टपोऱ्या जांभळाला मिळाले भौगोलिक मानांकन; १५० शेतकऱ्यांना होणार लाभ

Geographical Indication : पालघर जिल्ह्यात आढणाऱ्या बहाडोली जांभळाला भौगोलिक मानांकन मिळाले असून याचा थेट फायदा १५० शेतकऱ्यांना होणार आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : पालघर जिल्हा फळबागायत दारांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असून येथील चिकू प्रसिद्ध आहेत. तर चिकू या फळाला २०१६ साली डहाणू, घोलवड या नावाने भौगोलिक मानांकन मिळाले आहे. यानंतर आता जिल्ह्यात बहाडोली म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या जांभळाला देखील भौगोलिक मानांकन मिळाले असून बहाडोली आणि परिसरातील गावांमध्ये स्थानिक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. तर हे भौगोलिक मानांकन बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकरी गट या नावाने मिळाले आहे. याबाबत कृषी विभाग आणि 'आत्मा' अंतर्गत २०१९ पासून जांभूळ उत्पादकांना मार्गदर्शन केले जात होते. ३० मार्चला याबाबत प्रमाणपत्र मिळाले असून याचा थेट १५० शेतकऱ्यांना होणार आहे. 

जिल्ह्यातील बहाडोली आणि परिसरातील गावांमध्ये जांभूळ उत्पादक शेतकरी गट तयार करण्यात आला होता. तसेच या गटाला मानांकन मिळवण्यासाठी निकषांची पूर्तता करता यावी म्हणून कृषी विभाग आणि 'आत्मा' अंतर्गत मार्गदर्शन केले जात होते. यानंतर २३ मे २०२३ रोजी भौगोलिक मानांकनासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला जो मंजुर झाला असून ३० मार्चला बहाडोली जांभळाला मानांकन देण्यात आले आहे.

यामुळे गटात सहभागी असणाऱ्या १५० शेतकऱ्यांना या हंगामापासूनच जांभळाच्या व्यापारासाठी आकर्षित पॅकेजिंग आणि बोधचिन्हाचा वापर करता येणार आहे. तर यामुळे शेतकऱ्यांच्या व्यापारात वाढ होऊन आर्थिक विकास होण्यास मदत मिळणार आहे.  

बहाडोली जांभूळ औषधी गुणांनीयुक्त

बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकरी गट नावाने भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्याने बहाडोली आणि परिसरातील गावांमध्ये सध्या आंदोत्सव केला जात असून शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. या भागात असणाऱ्या जांभळाच्या बागांमध्ये वेगवेळे व्यवसाय केले जात आहेत. येथे औषधी गुणांनीयुक्त जांभळाच्या बियांपासून पावडर, तर जांभळाची वाईन निर्मिती करण्यात येत आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT