Sugarcane factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : ऊस उत्पादकांना संपूर्ण एफआरपी रक्कम अदा करावी

विभागातील एक दोन कारखाने वगळता एकही कारखान्याने पहिली उचल शेतकऱ्यांना दिलेली नाही.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यतील साखर कारखान्यांचे (Sugar Factory) यंदाचे गाळप (Sugarcane Crushing) बंद होण्यापूर्वी रिकव्हरी जाहिर करुन ऊस उत्पादक (Sugarcane Producer Farmer) शेतकऱ्यांना संपूर्ण एफआरपी (FRP) रक्कम अदा करावी.

अन्यथा १० एप्रिल पासून परभणी येथे बेमुदत उपोषण सुरु करण्यात येईल, असा इशारा परभणी जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे नांदेड विभागीय प्रादेशिक साखर सह संचालक यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर कारखाने बंद होण्यापूर्वी गाळप ऊसाची पूर्ण एफआरपीची ची रक्कम अदा करणे बंधनकारक आहे.त्यात ऊस गाळपास गेल्यानंतर पहिली उचल अर्थात ९.५ टक्के रिकव्हरी नुसार जी रक्कम होते ती १४ दिवसात देणे अनिवार्य आहे.

परंतु विभागातील एक दोन कारखाने वगळता एकही कारखान्याने पहिली उचल शेतकऱ्यांना दिलेली नाही. ऊस गाळप होऊन दोन तीन महिने झाल्यानंतरही शेतकऱ्यांना ऊसाचे देयक मिळालेले नाहीत. विभागातील अनेक कारखान्यांचे गाळप हंगाम आटोपून ते बंद होत आहेत.

परंतु अनेक शेतकऱ्यांची पहिली उचल कारखान्याकडे थकित आहे. ती रक्कम १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांना अदा करावी.

सर्व कारखान्यांनी अंतीम रिकव्हरी जाहिर करुन ऊसाची संपूर्ण एफआरपी द्यावी. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी १० एप्रिल पासून परभणी जिल्हाधिकरी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहेत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढग, गजान तुरे, भास्कर खटींग, राजाभाऊ आवरगंड, प्रसाद गरुड यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT