Sugarcane FRP : सोलापूर विभागात ‘एफआरपी’चे ८२२ कोटी थकित

साखर व उपउत्पादनांचे पैसे कारखान्यांना वेळेत उपलब्ध होत नसल्याने एफआरपी देण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे.
Sugar cane
Sugar caneAgrowon

Solapur News : सोलापूर विभागातील ५१ कारखान्यांकडे फेब्रुवारीअखेर बेसिक १०.२५ टक्के रिकव्हरीनुसार एकूण ८२२ कोटी रुपये एफआरपीची थकबाकी आहे. सहकारीच्या तुलनेने खासगी कारखान्यांकडे थकबाकी अधिक आहे.

हंगाम अंतिम टप्प्यात आला असून काही कारखाने बंद झाले तरी शेतकऱ्यांना एफआरपी (FRP) मिळेना अशी स्थिती आहे. दरम्यान, साखर (Sugar) व उपउत्पादनांचे पैसे कारखान्यांना वेळेत उपलब्ध होत नसल्याने एफआरपी देण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे.

सोलापूर विभागातील ५१ साखर कारखान्यांनी यंदा हंगाम घेतला. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ३७ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा समावेश आहे. यंदाच्या हंगामातील २८ फेब्रुवारीपर्यंतच ‘एफआरपी’चे बेसिक रिकव्हरीप्रमाणे ३८६८.६२ कोटी रुपये रक्कम ऊसबिलाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना मिळाले आहेत.

Sugar cane
Sugar Production : राज्यात पुढील वर्षी उसासह साखर उत्पादन वाढणार

सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपीचे ३०५५.४६ कोटी तर उस्मानाबाद जिल्ह्यातील कारखान्यांनी ८१३.१७ कोटी रुपये फेब्रुवारीअखेर दिले आहेत. असे असले तरीही सोलापूर जिल्ह्यातील २७ कारखान्यांकडे एफआरपीचे ७३०.७८ कोटी थकित आहेत.

कारखानानिहाय फेब्रुवारीअखेर थकीत एफआरपी (कोटीत)

सोलापूर जिल्हा : सिद्धेश्वर - ३८.८०, संत दामाजी - २२.२५, श्री मकाई - २६.१३, संत कुर्मदास - १८.३२, लोकनेते-२९.८५, सासवड माळी - २०.६९, लोकमंगल (बीबीदारफळ) - १०.६३, लोकमंगल (भंडारकवठे) - ७.८७, सिद्धनाथ - ४९.५८, जकराया - १३.६५, इंद्रेश्वर-१५.०८, भैरवनाथ (विहाळ) - ३५.९१,

भैरवनाथ (लवंगी) - ३६.७६, युटोपियन - ३५.९४, मातोश्री शुगर - २३.४१, बबनरावजी शिंदे- १७.२०, ओंकार - ०.४३, जयहिंद - ६.४३, विठ्ठल रिफाइंड-७५.१३, भीमा-६५.५९, सहकार शिरोमणी - ४४.२५, सीताराम महाराज - ९.१९, धाराशिव (सांगोला)-१९.७३, श्री शंकर - १३.८६, आवताडे शुगर्स - २४.१९.

Sugar cane
Chana Procurement : सात-बारा अद्ययावत नसल्याने हरभरा नोंदणीत अडचण
राज्य सरकारने एकरकमी एफआरपीचा आदेश काढला होता. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. शासनाने गेल्या वर्षी एफआरपी संदर्भात केलेल्या नियमानुसार सुद्धा सध्या थकित एफआरपी मोठी आहे. त्यासाठी २२ फेब्रुवारीला चक्का जाम आंदोलन केले. साखर आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली आहेत. पुढील १५ दिवसांत एफआरपी मिळण्याची अपेक्षा आहे. अन्यथा साखर आयुक्तालयासमोर तीव्र आंदोलन केले जाईल.
विजय रणदिवे, युवाआघाडी, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com