Fruit Orchard Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Orchard Subsidy: फळबाग अनुदान जाहीर, परंतु मिळणार केव्हा?

Government Relief Fund: काटोल व नरखेड तालुक्यात बुरशीजन्य रोगामुळे संत्रा व मोसंबी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसान भरपाईसाठी ९ कोटी ५८ लाख रुपयांची वाढीव मागणी मंजूर झाली असली, तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा कधी होणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News: बुरशीजन्य रोगांमुळे पाणी काटोल व नरखेड तालुक्यांत संत्रा व मोसंबीचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी काटोल व नरखेड तालुक्यांसाठी ९ कोटी ५८ लाख रुपयांची वाढीव मागणी करण्यात आली होती. त्याला मंजुरीही प्रदान करण्यात आली. ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते मयूर उमरकर यांनी केली आहे.

काटोल व नरखेड तालुक्यांत सात महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे संत्रा व मोसंबीवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे फळगळ झाली होती. तेव्हा सर्व्हे करून तो अहवाल शासनाला सादर करण्यात आला.

यानंतर विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी काटोल तालुक्यासाठी १९ कोटी ४३ लाख रुपये, तर नरखेड तालुक्यासाठी २८ कोटी ८८ लाख, असे एकूण ४८ कोटी ३१ लाख रुपये मंजूर करण्यात होते. परंतु या सर्व्हेमधून अनेक संत्रा व मोसंबी उत्पादक सुटले होते. त्यासाठीचा प्रस्ताव तयार करून काटोल तालुक्यासाठी चार कोटी ७८ लाख रुपयांची, तर नरखेड तालुक्यासाठी ४ कोटी ८० लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे.

आधीच शेतकरी अनेक संकटांना सामोरे जात आहे. अतिवृष्टी, योग्य भाव न मिळणे, तर कधी महावितरणच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. तरीही शासन शेतकऱ्यांविषयी निष्काळजीपणाने वागत आहे. तातडीने अनुदान मिळाले नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल.
मयूर उमरकर, माजी पंचायत समिती सदस्य, नरखेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सरी शक्य; उन्हाचा चटका कायम

Ratoon Sugarcane: खोडवा उसावरील एल निनोच्या उष्णतेचा ताण कसा कमी करावा?

Farmers Protest: शेतकरी अडचणीत, ऊस दर, धान खरेदी प्रश्नी राकेश टिकेत आक्रमक, मोठ्या आंदोलनाचा इशारा

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT