Akola Agriculture Damage agrowon
ॲग्रो विशेष

Akola Agriculture Damage : अकोला जिल्ह्यात नऊशे हेक्टरवरील फळपिके बाधित

Akola Rain : अकोला जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांत जिल्ह्यात झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे सुमारे नऊशे हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.

sandeep Shirguppe

Akola Weather : अकोला जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांत जिल्ह्यात झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे सुमारे नऊशे हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यात सात तालुक्यांतील १५७ गावे प्रभावित झाली असून, सुमारे ९०९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. लिंबू, ज्वारी, आंबा, मूग, कांदा, भूईमूग, केळी, संत्रा, सीताफळ इत्यादी फळपिकांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त १५ घरांची अंशतः पडझड झाली आहे.

मे महिन्यात मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अधून-मधून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. ढगाळ वातावरणात पातूर तालुक्यातील काही गावांमध्ये ९ ते १३ मे दरम्यान हा पाऊस झाला. त्याचा फटका तालुक्यातील आठ गावांना बसला. पावसामुळे २३४.३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यात लिंबू, कांदा, आंबा, उन्हाळी मूग व उन्हाळी उडीद या पिकांचा समावेश आहे.

नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठवला आहे. त्यानंतर १९ ते २२ मे दरम्यान सुद्धा जिल्ह्यातील तीन तालुक्यांत पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील अकोला, पातूर, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, अकोट, तेल्हारा, बाळापूर तालुक्यातील १५७ गावे प्रभावित झाली. अकोला तालुक्यातील ५४ गावे अवकाळी पावसामुळे बाधित झाली. त्यासोबतच १७४ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले.

लिंबू, ज्वारी, आंबा, मूग इत्यादी पिकांना फटका बसला. पातूर तालुक्यातील आठ गावांतील ९६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यासोबतच मूग, कांदा, भूईमूग, ज्वारी पिकांचे नुकसान झाले. मूर्तिजापूर तालुक्यातील १८ गावांना फटका बसला. १६४.७२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यात केळी, संत्रा, लिंबू, सीताफळाचा समावेश आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील २९ गावांना फटका बसला. ६४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

मूग, कांदा, भुईमूग, ज्वारी पिकांचे नुकसान झाले. अकोट तालुक्यातील १८ गावे प्रभावित झाली. १५५.६० हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले. त्यात मूग, कांदा, भुईमूग, ज्वारी पिकांचा समावेश आहे. तेल्हारा तालुक्यातील १५ गावात ८० हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले. तर बाळापूर तालुक्यातील १५ गावांत १५५ हेक्टर कांदा, पपई, ज्वारी पिकांचे नुकसान झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Watermelon Harvesting: गोड, दर्जेदार कलिंगडांसाठी उन्हाळ्यात काळजी आणि योग्य वेळी काढणी गरजेची

Agri Administration Discussion: नव्या गुणनियंत्रण संचालकाची चर्चा

Ujani Dam Water Release: उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले

Lemon Rate: अमरावतीत लिंबाला ६००० ते ७००० रुपये दर

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी

SCROLL FOR NEXT