Godsakhar Sugar Factory fraud agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Sugarcane Factory Fraud : कोल्हापुरातील आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्यात २९ कोटींचा गैरव्यवहार उघड

Godsakar Sugar Factory : कोल्हापूर जिल्ह्यातील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात २९ कोटींचा गैरव्यवहार उघड झाला आहे. याप्रकरणी तत्कालीन अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

sandeep Shirguppe

Appasaheb Nalvade Sugar Factory : कोल्हापूर जिल्ह्यातील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात २९ कोटींचा गैरव्यवहार उघड झाला आहे. याप्रकरणी तत्कालीन अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मागील कित्येक महिन्यांपासून गुन्हा दाखल होणार का नाही अशी चर्चा होती. परंतु कारखान्याचे लेखापरीक्षक सुशांत फडणीस यांनी याबाबत गडहिंग्लज पोलिसांत शुक्रवार(ता.१३) गुन्हा दाखल केला आहे.

बेकायदा डिस्टिलरी विस्तार, जुना गिअर बॉक्स खरेदी व बॉयलर यामध्ये ११ कोटी ४२ लाख ६४ हजारांचा घोटाळा उघडकीस आला आहे. तर आधुनिकीकरण विस्तारीकरण व खरेदीमध्ये अनियमिता झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामध्ये अध्यक्षांसह तत्कालीन कार्यकारी संचालक, सचिव, ठेकेदार यांचा समावेश आहे. अध्यक्ष वगळता कोणत्याही संचालकांना दोषी धरले नसून एवढ्या मोठ्या रकमेचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

साखर विक्री बंद

कारखाना आर्थिक अडचणीत आल्यानंतर दहा वर्षांपूर्वी २०१३ मध्ये कामगारांचा १८ महिन्यांचा पगार थकला होता. नवीन संचालक मंडळ सत्तेवर आल्यानंतर काही अंशी पगार अदा केले होते. दरम्यान, एकूण ३४ महिन्यांचे वेतन थकीत राहिल्याने कामगारांनी गतवर्षीची उत्पादित साखरच विक्रीसाठी सोडली नव्हती.

थकीत वेतनासाठी कामगारांनी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन केले होते. आताच्या संचालक मंडळाने आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे आगामी गळीत हंगाम, मशिनरी मेंटेनन्स, तोडणी वाहतुकदारांना अॅडव्हान्स देण्यास केडीसीतर्फे अर्थसहाय्य मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. परंतु कारखान्याच्या अध्यक्षांवर गुन्हा दाखल झाल्याने पुढे काय होणार याबाबत कामगार आणि शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Heatwave: विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज

Maharashtra Farmer Scheme: पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना; मिळणार शून्य टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Irrigation Water Management Projects: सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना तुषार संच वितरित

Fishermen Relief: मच्छीमारांना दिलासा; पाच जिल्ह्यांतील केंद्रांचे आधुनिकीकरण

Rural Water Crisis: चाळीस गावांची पाण्यासाठी वणवण

SCROLL FOR NEXT