Employment Guarantee Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Employment Guarantee Scheme : सातारा जिल्ह्यात ५७५ कामांवर चार हजार मजूर कार्यरत

MGNREGA : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतंर्गत ५७५ कामे सुरू असून, त्यावर ४२०४ मजूर कार्यरत आहेत. २०२३-२४ साठी नवीन २७३ मजुरीचा दर निश्‍चित केला आहे.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतंर्गत ५७५ कामे सुरू असून, त्यावर ४२०४ मजूर कार्यरत आहेत. २०२३-२४ साठी नवीन २७३ मजुरीचा दर निश्‍चित केला आहे. वाढलेल्या मजुरीमुळे मजुरांची संख्या वाढल्याचे चित्र असून, सध्या दुष्काळी भागात रोजगार हमीच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत २६६ प्रकारचे वैयक्तिक व सार्वजनिक कामे केली जातात. मजुरांनी काम केल्यानंतर निर्माण होणाऱ्या दिवसांकरिता केंद्र शासनाने निश्‍चित केलेल्या दरानुसार अकुशल मजुरी त्यांच्या खात्यावर दिली जाते. गावे स्वयंपूर्ण व स्वावलंबी होण्यासाठी ही योजना राबवली जात आहे. केंद्र सरकारने २०२३-२४ साठी नवीन २७३ मजुरी दर निश्‍चित केला आहे.

या वर्षाकरिता जिल्ह्याला सात लाख, ४३ हजार ३३५ मनुष्य दिवस निर्मितीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी सप्टेंबर अखेर चार लाख पाच हजार मनुष्य दिवस निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी जास्तीत जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ८.९६ लाख मजूर क्षमता असलेल्या ७६५८ कामांचा शेल्फ मंजूर करून ठेवण्यात आला आहे.

सध्या जिल्ह्यात ५७५ कामे सुरू असून, त्यावर ४२०४ मजूर कार्यरत आहेत. यापैकी ग्रामपंचायत विभागाकडील ४५२ कामांचा समावेश असून, यामध्ये घरकुलाची १४५, सिंचन विहिरींची ९३, वृक्ष लागवड ६३, बांबू लागवड ६२, रस्ते २९, शाळेची संरक्षक भिंत बांधणे आदी कामांचा समावेश आहे.

कृषी विभागाची फळबाग लागवडीची ४४, शेततळे एक, रोपवाटिका तीन, कामे सुरू असून, रेशीम विभागामार्फत ६० कामे सुरू असून, सामाजिक वनीकरण विभागामार्फत तीन, रोपवाटिका, वृक्ष लागवडीची १२ कामे सुरू आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT