Forest Fire  Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Crisis : वणव्यांमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर

Forest Fire : शिराळा तालुक्यात डोंगरांना आगी लागण्याचे प्रमाण प्रत्येक वर्षी वाढत चालले आहे. त्यामुळे जानेवारी ते एप्रिलदरम्यान तालुक्यातील डोंगररांगा काळवंडलेल्या अवस्थेत दिसून येतात.

Team Agrowon

Sangli News : शिराळा तालुक्यात डोंगरांना आगी लागण्याचे प्रमाण प्रत्येक वर्षी वाढत चालले आहे. त्यामुळे जानेवारी ते एप्रिलदरम्यान तालुक्यातील डोंगररांगा काळवंडलेल्या अवस्थेत दिसून येतात.

आगीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने, ओला चारा कमी झाल्याने, सुका चारा उपलब्ध होत नसल्याने डोंगरकपारी व दऱ्या-खोऱ्यांत असणारे गवत जपले, तरच टंचाई काळात जनावरांना काही प्रमाणात चारा उपलब्ध होईल.

त्यामुळे प्रत्येक वर्षी होणारे हे वणव्याचे अग्नितांडव रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नाची आवश्‍यकता आहे. खासगी क्षेत्रातही लोकांनी जाळरेषा काढल्या तर आगींचे प्रमाण कमी होऊन संभाव्य नुकसान टाळण्यासाठी मदत होईल.

डोंगरावर वणवे का लागतात, हे आता गुपित नाही. बऱ्याचदा अतिक्रमण आणि वन्य प्राण्यांची शिकार सोपी व्हावी, यासाठी वणवे लावले जातात. मात्र अनेकदा उत्तम प्रतीचे गवत मिळते, या समजुतीतून ग्रामीण भागात डोंगरांवर वणवे लावले जातात.

काही वेळा शेतातील पाला-पाचोळा पेटवत असताना ती आग जंगलात लागते. त्यातून वनसंपदेचा नाश होण्यासह वन्य प्राण्यांचे अस्तित्वदेखील धोक्यात येते. भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार वणवा लावणे, हा गंभीर गुन्हा आहे.

यावर्षी गवत जाळले तर पुढील वर्षी चांगले येते, हा नागरिकांचा गैरसमज आहे. गवत रानात शिल्लक राहिले, तर त्याचे खत होते. त्यांच्यामुळे जमिनीची धूप होत नाही. पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. पावसाळा सुरू होईपर्यंत प्राण्यांना चारा म्हणून उपयोगी पडते. गवत जाळल्यास जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते. जमिनीत पुरेसे पाणी मुरत नाही. त्यामुळे गैरसमज करून लोकांनी जंगलाला आग लावू नयेत. भारतीय वन अधिनियम १९२७ नुसार वणवा लावणे, हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे.
- अनिल वाजे, वनपाल

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT