Poladpur News : तालुक्यातील लोहारमाळ येथील सीएनजी गॅस पंपजवळ मोठ्या प्रमाणात वणवा लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महाड औद्योगिक वसाहत, तसेच महाड नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते.
या वेळी अग्निशमन कर्मचाऱ्यांनी तत्काळ वणव्यावर नियंत्रण मिळवल्याने पुढील मोठा अनर्थ टळला, मात्र वारंवार लागणाऱ्या वणव्यावर वन विभागाने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पोलादपूर तालुक्यात गेल्या काही वर्षभरात लागलेल्या वणव्यामुळे मोठ्या प्रमाणावर वनसंपदेचे नुकसान झाले आहे. वणवा विरोधी कायदा सक्षम नसल्याने त्यामध्ये वाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे. नुकतेच तालुक्यातील लोहारमाल येथील सीएनजी गॅस पंपजवळ मोठ्या प्रमाणात वणवा लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र अग्निशमन दलाच्या जवानांची तत्काळ आग आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली, मात्र तालुक्यात वणवा लागण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तालुक्यातील अनेक गावांत सायंकाळी किंवा पहाटेच्या सुमारास गवतासह झाडाचा पाला जळून जाण्यासाठी वणवे लावण्यात येत आहेत,
मात्र वाऱ्याच्या वेगात वणवा सर्वत्र पसरत असल्याने अनेक दुर्दैवी घटना यापूर्वी तालुक्यात घडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील डोंगररांगांवर वणवे लावण्याच्या घटना आजही कायम आहेत. डोंगरातील वणव्यांमुळे येथील अनेक उपयुक्त वृक्षवेली नष्ट होऊ लागल्या आहेत. बहुतांश गावात गैरसमजातून व चुकीच्या परंपरेतून हे वणवे पेटवले जात आहेत. गवताच्या चांगल्या वाढीसाठी वणवे पेटविण्यात येत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.