Orange Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Orchard : संत्रा फळबागांना विदेशी गुंतवणूकदारांची भेट

Orange Market : मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा गावातील संत्रा फलोत्पादन बागांना बुधवारी (ता.२९) परदेशी गुंतवणूकदारांनी भेट दिली.

Team Agrowon

Washim News : मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा गावातील संत्रा फलोत्पादन बागांना बुधवारी (ता.२९) परदेशी गुंतवणूकदारांनी भेट दिली. नाशिक येथील सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या गुंतवणूकदार असलेल्या नेदरलँड्स येथील एफएमओ आणि अमेरिका येथील जीईएफ कंपनीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

वाशीम जिल्ह्यातील वनोजा हे गाव संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून येथील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चांगल्या दर्जाचा संत्रा उत्पादीत करतात. या संत्रा बागांची पाहणी करून विदेशी पाहुण्यांनी शेतकऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली आहे.

नेदरलँड्स येथील एफएमओ कंपनीचे मॅथिज व्हॅन बेव्हरवुर्डे आणि प्रोपार्को कंपनीचे फ्रान्स येथील एडवर्ड बफीर यांनी बागेची पाहणी करीत त्यांनी शेतकऱ्यांना येणाऱ्या विविध समस्या, कंपनीकडून असलेल्या अपेक्षा, फलोत्पादन शेतकरी फवारणी कशा प्रकारे करतात, तसेच पाणी व्यवस्थापन आदी बाबींची माहिती घेतली.

या वेळी पवन मोहरुत, प्रवीण शेळके, धनंजय गवळे, वनोजा येथील शेतकरी अनिल राऊत, संजय राऊत, दादाराव राऊत, नीलेश राऊत, मोहन राऊत, हिम्मत राऊत, विनोद राऊत, मुरलीधर राऊत, हरीश राऊत, नीलेश दा. राऊत, सचिन राऊत, प्रथम राऊत, संजय गांजरे यांच्यासह बहुसंख्य उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT