Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Mumbai Bank Cooperative Building : मुंबै बँकेच्या सहकार भवनसाठी ‘पशुसंवर्धन’ ऐवजी म्हाडाची जमीन

Mhada Department Land : केवळ एका पत्राच्या आधारे गोरेगाव येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाची तीन एकर जागा मुंबै बँकेच्या सहकार भवनासाठी देण्याचा निर्णय मागे घेत राज्य सरकारने अखेर म्हाडाची ऐन मोक्याची सायन येथील जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Team Agrowon

Mumbai News : केवळ एका पत्राच्या आधारे गोरेगाव येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाची तीन एकर जागा मुंबै बँकेच्या सहकार भवनासाठी देण्याचा निर्णय मागे घेत राज्य सरकारने अखेर म्हाडाची ऐन मोक्याची सायन येथील जागा देण्याचा निर्णय घेतला आहे.

रविवारी (ता. २५) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत गृहनिर्माण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून, या प्रस्तावावर विधी व न्याय विभागाने प्रतिकूल शेरे मारूनही हा प्रस्ताव मंजूर केला आहे.

बोरिवली येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाची तीन एकर जागा भाजपचे आमदार प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेच्या सहकार भवनासाठी देण्याचा निर्णय शासन आदेश काढून केला होता. मात्र, अवघ्या काही तासांत हा शासन आदेश राज्य सरकारच्या संकेतस्थळावरून काढून टाकण्यात आला. तसेच या आदेशात पशुसंवर्धन विभागाला १०० कोटी रुपये द्यावेत, अशी अट टाकली होती.

मात्र, या आदेशातील मुंबै बँकेचा उल्लेख काढून टाकावा यासाठी भाजपच्या गोटातून आग्रह धरला होता. परंतु पशुसंवर्धन विभागाने त्यास नकार दिला होता. त्यानंतर म्हाडाच्या जागेवर सहकार भवन उभारण्यासाठी प्रस्ताव दिला. सायनमधील ही जागा २४६६. ५७ चौरसमीटर क्षेत्रफळाची असून त्याची बाजारभावानुसार किंमत २४ कोटी २३ लाख ५३९ हजार रुपये आहे.

मात्र, ही जागा देण्यासाठी गृहनिर्माण विभागाने स्पष्ट मत व भूमिका घेतल्याचे दिसून येत नाही. तसेच यामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दायित्वाचा, महसूल हानीचा उल्लेख विभागाने केलेला नाही, असा शेरा विधी व न्याय विभागाने मारला आहे.

जागा देण्यावरून गदारोळ

गोरेगाव येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाची तीन एकर जागा देण्यावरून मोठा गदारोळ झाला होत. पशुवैद्यकीय महाविद्यालयाची बहुतांश जागा डोंगराळ आहे. तर जी जागा वापरण्यायोग्य असलेली तीच तीन एकर जागा सहकार भवनासाठी दिल्याने टीका होत होती. तसेच पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाने जागा देण्याचा सपाटा लावल्याने टीका करण्यात येत होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Heat Wave: विदर्भात उष्णतेची लाट; विदर्भात शनिवारपासून काही भागात वादळी पावसाचा अंदाज

सोनसवाडी शिवार नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत समाविष्ट करा

Jalna Nanded Highway: जालना-नांदेड महामार्गाचे भूसंपादन तातडीने पूर्ण करा

Bacchu Kadu Joins Shiv Sena: बच्चू कडूंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर

Soytbean Rate: सोयाबीनचा ६ हजारांचा टप्पा पार

SCROLL FOR NEXT