Foggy Weather  Agrowon
ॲग्रो विशेष

Foggy Weather : पुणे जिल्ह्यात धुक्याची चादर

Clod Weather Update : थंडीत चढ-उतार होत असताना जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे.

Team Agrowon

Pune News : थंडीत चढ-उतार होत असताना जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. अनेक ठिकाणी हलका पाऊस पडला. त्यानंतर गुरुवारी (ता. ११) सकाळी ठिकठिकाणी धुक्याची चादर पसरली. काहीशी वाढलेली थंडी गहू, हरभरा पिकांसाठी पोषक असली तरी काही प्रमाणात रोग, किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात सतत बदल होत आहे. विविध भागांत पाऊस पडत आहे. कधी पाऊस, ढगाळ हवामान तर कधी थंडी असे संमिश्र वातावरण आहे. गुरुवारी दाट धुके पडले होते.

त्यामुळे पिकांवर दव तयार झाले. धुक्याचा परिणाम पीक वाढीवरही होणार आहे. परिणामी, शेतकऱ्यांना फवारणीचा खर्च करावा लागणार आहे. धुक्याचा फटका रब्बी पिकांसह कांदा पिकालाही बसेल.

पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी करावी लागेल. फवारणीच्या अतिरिक्त खर्चामुळे भांडवली खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

लहरी वातावरणाचा फटका

बदलत्या वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पिकांवर महागडी औषधे फवारणी करावी लागत आहेत.

त्यामुळे भांडवली खर्चात वाढ होत आहे. टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लॉवर, कांदापात, कोथिंबीर, मेथी, गवार या पिकांवर करपा, बोकड्या, आकसा, भुरी, मावा, तुडतुडे आदी रोग वाढले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT