Katraj Milk Agrowon
ॲग्रो विशेष

Katraj Doodh Sangh : कात्रज दूध संघाकडून चारा, मध उत्पादनास चालना

Fodder Production : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) वतीने शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारे मूरघास व मध उत्पादन सुरू करणार आहे.

गणेश कोरे

Pune News : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) वतीने शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारे मूरघास व मध उत्पादन सुरू करणार आहे. केंद्र सरकारच्या १० हजार शेतकरी उत्पादक कंपनी निर्मिती योजनेअंतर्गत संघाला केंद्र शासन व राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाद्वारे चारा निर्मिती आणि मधुमक्षीपालन शेतकरी उत्पादक कंपनी निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. याद्वारे शिरूर तालुक्यात दोन शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

तांबे गुरुजी फॉडर प्लस चारा निर्मिती संस्था व चारा साठवणूक शेतकरी उत्पादक कंपनी रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथे व सतसाहेब मध उत्पादक व विक्री शेतकरी उत्पादक कंपनी न्हावरा (ता. शिरूर) येथे कंपनी निर्माण केली आहे.

या दोन्ही कंपनीचे संचालक व सभासदांना संघाचे संचालक निखिल तांबे, प्रकल्प समन्वयक प्रशांत अहिरे व संघाचे प्रतिनिधी अमोल सोंडकर यांच्या उपस्थितीत कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे प्रशिक्षण देण्यात आले.

शिरूर तालुक्यात निर्माण केलेल्या कंपन्यांत शेतकरी हेच सभासद आहेत. शेतकरीच या कंपन्यांचे व्यवस्थापन करतात. नवीन तंत्रज्ञान अद्ययावत करणे, शेती मालासाठी बाजार पेठ निर्माण करणे, विविध पिकांचे उत्पादन घेणे, उत्पादित मालावर प्रक्रिया करणे, चारा पिकांचा मुरघास तयार करणे, तयार माल कंपनीच्या नावाने ब्रँडिंग करून विपणन करणे असा त्यामागे उद्देश आहे.

दोन्ही कंपन्यांचा लाभ दूध संघाच्या कार्यक्षेत्रातील सर्व दूध उत्पादक संस्थांना होईल. चारा उत्पादक कंपनीमार्फत मुरघासाची निर्मिती करून रास्त दरात पुरवठा करण्यात येईल. मध उत्पादक कंपनीमार्फत मधनिर्मिती करून मध विक्री व्यवसाय करण्याचा कंपनीचा व संघाचा मानस आहे.
- भगवान पासलकर, अध्यक्ष, कात्रज डेअरी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT