Flower Market Agrowon
ॲग्रो विशेष

Flower Market : बारामतीत जळोची येथे फूल मार्केट सुरू

Baramati Flower Market : महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुण्यतिथी निमित्ताने बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे जळोची भाजी मार्केटमध्ये फूल मार्केटचा प्रारंभ बाजार समितीचे सभापती सुनील पवार यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.

Team Agrowon

Pune News : महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुण्यतिथी निमित्ताने बारामती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे जळोची भाजी मार्केटमध्ये फूल मार्केटचा प्रारंभ बाजार समितीचे सभापती सुनील पवार यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.

या वेळी बाजार समितीचे संचालक संतोष आटोळे, फळे व भाजीपाला अध्यक्ष सईद बागवान, आडदार प्रवीण भोईटे, संजय गदादे, मनोज नेवसे तसेच शेतकरी उपस्थित होते. जळोची भाजी मार्केट सेलहॉल नं. ५ मधील गाळा नं. ९० चे आडतदार सोमनाथ झगडे व महेश शिंदे यांनी एकत्र येऊन सर्व प्रकारच्या फुलांची विक्री उघड लिलावाने सुरू केली.

पहिल्या दिवशी झेंडू, गुलाब, शेवंती, पासली पेंडी आदी फुलांची आवक झाली. शेळगाव, इंदापूर, फलटण, पिपंळी तेथील गणेश कटके, अमित हेगडे, ओंकार शिंदे, अनिल शहा या शेतकऱ्यांनी फुले विक्रीस आणली होती.

या वेळी झेंडूला कमाल ३५ रुपये प्रतिकिलो दर निघाला, तर शेवंती ३० ते ४३ प्रतिकिलो आणि गुलाब शेकडा २०० ते ५०० रुपये, पासली पेंडी शेकडा १००० ते १७०० पर्यंत अशी विक्री झाली.

मार्केटमध्ये फुलांची विक्री उघड लिलाव पद्धतीने सुरू केली असल्याने फुलांचे दर चांगले निघतील. सुट्टीचे दिवस सोडून रोज दुपारी बारा वाजता फुलांचे लिलाव होतील. सर्व फूल उत्पादक शेतकऱ्यांनी आपली फुले लिलावापूर्वी वेळेत आणि चांगल्या पॅकिंगमध्ये आणावीत.

भविष्यात फूल मार्केटसाठी विविध सुविधा संचालक मंडळ पुरविणार असल्याचे आश्वासन समितीचे सचिव अरविंद जगताप यांनी दिले. तर सईद बागवान यांनी आभार मानले.

तालुक्यात मोठ्या प्रमाणात फूल उत्पादक शेतकरी आहेत. त्याची मागणी लक्षत घेऊन हे मार्केट सुरू करण्यात आले आहे. फूल उत्पादक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन फुलांची विक्री जळोची मार्केटमध्ये करावी.
- नीलेश लडकत, उपसभापती, बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT