Udgir APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Udgir APMC : शेतकरी म्हणून निवडून आलेले सभापती हुडेंसह पाच जण अपात्र

APMC Update : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकीत शेतकरी नसताना शेतकऱ्यांसाठी राखीव जागांवर संचालक म्हणून निवडून आलेल्या सभापती शिवाजीराव हुडे यांच्यासह पाच संचालकांना अपात्र ठरवण्यात आले आहे.

Team Agrowon

Latur News : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकीत शेतकरी नसताना शेतकऱ्यांसाठी राखीव जागांवर संचालक म्हणून निवडून आलेल्या सभापती शिवाजीराव हुडे यांच्यासह पाच संचालकांना अपात्र ठरवण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. मुकेश बारहाते यांनी नुकताच हा निर्णय दिला. अपात्र झालेल्या अन्य संचालकांत पद्माकर मनोहर उगिले, शामराव समर्थ डावळे, बालाजी मष्णाजी देवकते व ज्ञानेश्‍वर विश्‍वंभर पाटील यांचा समावेश आहे.

याप्रकरणी झुंजार पाटील, हणमंत शेळके व भिवाजी चिखले यांनी येथील जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानंतर संचालक शामराव डावळे यांनी या प्रकरणाची सुनावणी लातूरऐवजी अन्य जिल्हा उपनिबंधकांकडे घ्यावी, अशी मागणी केली होती.

त्यानुसार छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा उपनिबंधकांसमोर हे प्रकरण वर्ग करण्यात आले व सुनावणीनंतर जिल्हा उपनिबंधकांनी २६ जून २०२४ रोजी पाच संचालकांना अपात्र करण्याचा निर्णय दिला होता. त्याविरुद्ध संचालकांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर नव्याने सुनावणी घेऊन चार आठवड्यांत निर्णय घेण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना खंडपीठाने २९ जुलै रोजी दिले.

त्यानंतर सुनावणी घेऊन जिल्हा उपनिबंधक डॉ. बारहाते यांनी संचालकांना अपात्र करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. उदगीर बाजार समितीच्या संचालक मंडळाची एप्रिल २०२३ मध्ये निवडणूक झाली. यात सहकारी संस्था मतदार संघातून ११, तर ग्रामपंचायत मतदारसंघातून चार असे १५ शेतकरी प्रतिनिधी निवडून द्यायचे होते.

यात उत्पन्नाचा मुख्य स्रोत शेती नसतानाही सभापती हुडे, संचालक पद्माकर उगिले, श्यामराव डावळे, बालाजी देवकते व ज्ञानेश्‍वर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला व सर्व निवडून आले. त्याविरूद्ध जून २०२३ मध्ये पाटील, शेळके व चिखले यांनी तक्रार दाखल केली होती.

यात हुडे हे आडत व्यापारी, उगीले हे कृषी प्रक्रिया उद्योजक, डावळे व देवकते हे अनुदानित शिक्षण संस्थेत नोकर तर पाटील हे प्रक्रिया उद्योजक असल्याचे म्हटले होते. सुनावणीत पाचही संचालकांच्या उत्पन्नाचा स्रोत हा शेती नसल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणात अॅड. अविनाश इरपतगीरे यांनी तक्रारदारांचा बाजू मांडली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT