Farmer Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Subsidy List: दीड लाख शेतकऱ्यांची पहिली निवड यादी प्रसिद्ध

Agriculture Scheme: राज्य सरकारने 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्व स्वीकारून महाडीबीटी योजनेतून अनुदान वाटपासाठी दीड लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. शेतकऱ्यांना आता १० दिवसांत आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.

मनोज कापडे

Pune News: ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वानुसार अनुदान वाटण्यासाठी राज्यातील दीड लाख शेतकऱ्यांची पहिली यादी कृषी विभागाने प्रसिद्ध केली आहे. कृषी योजनांमधून अनुदान मिळवण्यासाठी ‘महाडीबीटी’च्या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यांची निवड सोडत पद्धतीनुसार केली जात होती. मात्र, सोडत पद्धत रद्द करून राज्य शासनाने ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ अशी नवी पद्धत स्वीकारली आहे.

त्यानुसार, आता पहिल्या टप्प्यात १,५२,१४३ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. या शेतकऱ्यांनी निवड केलेल्या घटकांची अनुदान रक्कम ८४० कोटी रुपयांच्या आसपास आहे. नव्या पद्धतीला बुधवारी (ता. २१) मुंबईत झालेल्या खरीप हंगामाच्या राज्यस्तरीय बैठकीत राज्य शासनाने मान्यता दिली व त्यानंतर लगेचच शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अनुदानासाठी निवड झाल्याबद्दल दीड लाख शेतकऱ्यांची यादी महाडीबीटी संकेतस्थळावर, कृषी विभागाच्या संकेतस्थळावर तसेच कृषी विभागाच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या लॉगइनमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

याशिवाय या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून लघूसंदेश (एसएमएस) पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता पुढील दहा दिवसांत अत्यावश्यक कागदपत्रे जमा करावी लागतील. त्याबाबत शेतकरी ओळख क्रमांकाच्या (फार्मर आयडी) आधारे संकेतस्थळावर लॉग इन करताच माहिती उपलब्ध होईल.

निवड झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप फार्मर आयडी मिळाला नसल्यास गावातील सार्वजनिक सुविधा केंद्रांतून मोफत काढून घ्यावा. मात्र, दहा दिवसांत कागदपत्रे जमा न केल्यास निवड केलेला अर्ज आपोआप रद्द केला होणार आहे, असे कृषी विभागातून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT