Government Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Aapli Pension Scheme : ‘आपली पेन्शन’ मोहिमेला राज्यात प्रथम पुरस्कार

राज्य शासनाने राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा ही योजना सुरू केली.

Team Agrowon

Nanded News : राज्य शासनाने राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा ही योजना सुरू केली. सन २०२२-२३ या वर्षाकरीता घेतलेल्या या स्पर्धेचे निकाल राज्य शासनाने जाहीर केले आहेत.

यात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सुरू केलेल्या संजय गांधी निराधार योजना अनुदान घरपोच वाटप या अभिनव उपक्रमाला १० लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार जाहीर केला आहे.

राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय निवड समिती मार्फत हे पारितोषिक शासन निर्णयाद्वारे बुधवारी (ता. १९) जाहीर केले आहेत.

प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होऊन त्यात लोकाभिमुखता यावी व पारदर्शकतेसमवेत सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित होण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा ही योजना सुरू केली आहे.

समाजातील वृद्ध, निराधार, दिव्यांगजणासाठी शासनाने विविध आर्थिक लाभाच्या योजना सुरू केल्या आहेत. हे अर्थसाहाय्य घेण्यासाठी प्रत्येकवेळी त्यांना बँकेपर्यंत जाण्यासाठी लागणारे कष्ट, वेळ व खर्च लक्षात घेता आपली पेन्शन आपल्या दारी ही अभिनव योजना अभिजित राऊत यांनी जळगाव जिल्हाधिकारी म्हणून सुरू केली होती.

या योजनेने सर्वसामान्यांना दिलासा देण्यासमवेत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, वयोवृद्ध, अनाथ बालके आदी योजनेतील लाभार्थ्यांना याचा लाभ झाला.

नांदेड जिल्ह्यातही ही योजना लवकरच सुरू करणार...

नांदेड जिल्ह्याचा विस्तार हा व्यापक आहे. यात किनवट, हदगाव, हिमायतनगर सारखे आदिवासी बहुल तालुकेही आहेत. सर्वसामान्यांना त्यांच्या योजनेचे लाभ विनासायास त्यांच्या पर्यंत पोहोचावेत अशी यंत्रणा उभी करण्याचा आनंद खूप वेगळा आहे.

नांदेड जिल्ह्यातही आपली पेन्शन आपल्या दारी ही अभिनव योजना लवकरच कार्यान्वित करीत असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले. यासंदर्भात प्राथमिक नियोजन व पूर्व तयारी सुरू केली असल्याचे ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Pests: टोमॅटो पिकातील रस शोषक किडींना घाला आळा

Nashik Drought : नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लासलगाव येथील बैठकीत ठराव

Tanker Water Supply: मागेल त्याला टँकरने पाणी : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Irrigation Water Rates: उपसा सिंचनच्या पाणीवापराचे दर निश्चित; कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांची माहिती

Maharashtra Cabinet Decisions: दुष्काळ निवारणासाठी सरकारचे मोठे पाऊल, कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंधही रद्द, मंत्रिमंडळ बैठकीत ५ महत्त्वाचे निर्णय

SCROLL FOR NEXT