Sugarcane Crushing Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : वारणा साखर कारखान्याची पहिली उचल ३२२० रुपये

Sugarcane Season 2024 : आजअखेर एकूण २ लाख ४६ हजार ९१५ टन गाळपाचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत सर्व ऊस उत्पादक सभासदांनी व गेटकेन ऊस उत्पादकांनी सुरुवातीपासूनच ऊस गळितास पाठवून मोलाचे सहकार्य केले आहे.

Team Agrowon

Kolhapur News : येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याकडे चालू गळीत हंगाम २०२४-२०२५ मध्ये गळितास येणाऱ्या उसास प्रतिटन ३२२० रुपयांप्रमाणे पहिली उचल देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याचे वारणा समूहाचे नेते व कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी नुकतेच सांगितले.

हंगाम २०२४-२५ मध्ये मार्चमध्ये येणाऱ्या उसाला प्रतिटन ३४०० रुपये दर तसेच वार्षिक सभेमध्ये जाहीर केल्याप्रमाणे मोटारसायकलच्या लकी ड्रॉची प्रोत्साहनपर बक्षीस योजना चालू राहणार असल्याने सभासद, ऊस उत्पादकांची दिवाळीही गोड करणार असल्याचे आमदार डॉ. कोरे यांनी या वेळी सांगितले.

आजअखेर एकूण २ लाख ४६ हजार ९१५ टन गाळपाचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत सर्व ऊस उत्पादक सभासदांनी व गेटकेन ऊस उत्पादकांनी सुरुवातीपासूनच ऊस गळितास पाठवून मोलाचे सहकार्य केले आहे. याबद्दल आमदार डॉ. कोरे यांच्यासह संचालक मंडळाने सर्वांचे आभार मानले.

चालू गळीत हंगामात यापुढेही सर्व सभासद व गेटकेन ऊस पुरवठादार यांनी पिकविलेला ऊस कारखान्यास पुरवठा करून गाळपाचे १६ लाख टनांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार डॉ. कोरे यांनी केले.

बैठकीस कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, सर्व संचालक, सदस्य, कार्यकारी संचालक शहाजीराव भगत, अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT