APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Hinganghat APMC : हिंगणघाट बाजार समितीने उभारली अग्निशमन सेवा

Fire Fighting Center : हिंगणघाट बाजार समितीत हंगामात कापसाची सर्वाधीक उलाढाल होते. त्यासोबतच बाजार समितीच्या हद्दीत प्रक्रिया उद्योगही सर्वाधीक आहेत. त्यामुळेच आगीची जोखीमही वाढती राहते.

Team Agrowon

Wardha News : कापसाची आवक आणि सर्वाधीक प्रक्रिया उद्योग यामुळेच हिंगणघाटला विदर्भाचे कापूस हब म्हणूनही ओळखले जाते. मात्र याच हिंगणघाट तालुक्‍यात कापसावरील प्रक्रिया उद्योगामुळे आगीची जोखीमही सर्वाधीक राहते.

ही बाब लक्षात घेता हिंगणघाट बाजार समितीने पुढाकार घेत स्वतःची अग्निशमन यंत्रणा उभारली आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारची स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा असलेली ही एकमेव बाजार समिती ठरली आहे.

हिंगणघाट बाजार समितीत हंगामात कापसाची सर्वाधीक उलाढाल होते. त्यासोबतच बाजार समितीच्या हद्दीत प्रक्रिया उद्योगही सर्वाधीक आहेत. त्यामुळेच आगीची जोखीमही वाढती राहते. सध्या हिंगणघाट नगरपालिकेकडे अग्निशमन यंत्रणा आहे. परंतु त्यांच्या मर्यादा आहेत. त्याच कारणामुळे बाजार समितीचे सभापती ॲड. सुधीर कोठारी यांनी पुढाकार धेच बाजार समितीच्या माध्यमातून अग्निशमन यंत्रणा उभारली आहे. आपत्तीकाळात ती सेवा देणार आहे.

शेतकरी हिताला प्राधान्य देणाऱ्या या बाजार समितीत येत्या काळात माती, पाणी आणि पान परीक्षण प्रयोगशाळा उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्या ठिकाणी या सर्व घटकांचे पृथ्थकरण करण्यात येईल. त्याआधारे पिकावर कोणत्या प्रकारचा कीड, रोग आहे याविषयी माहिती होईल. त्याआधारे शेतकऱ्यांना उपाययोजना शिफारशीत केल्या जाणार आहे. कृषी सेवा केंद्रावरील अवलंबिता कमी करण्याचा उद्देश त्यामागे आहे.

त्यासोबतच कृषी चिकित्सालय संकल्पना राबविण्याचाही बाजार समिती प्रशासनाचा मानस आहे. त्याकरिता तज्ज्ञांची नेमणूक केली जाणार असून हंगामात पीक व्यवस्थापन विषयक सल्ला ते देतील. गावखेड्यातील नागरिकांचे आरोग्यविषयक प्रश्‍न सोडविता यावे याकरिता मोबाइल मेडीकल व्हॅन उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

कोल्डस्टोरेज उभारले जाणार असून शेतकऱ्यांचा शेतीमाल सवलतीच्या दरात ठेवण्याची सोय राहणार आहे. व्यापाऱ्यांसाठी मात्र व्यावसायिक दरानुसार आकारणी होईल. या भागातील तूर, हरभऱ्यासह नाशवंत शेतमाल ठेवण्याची सोय याव्दारे उपलब्ध होईल. बाजार समितीने चार ग्रेडरची नियुक्‍ती केली आहे. त्यांच्या माध्यमातून कापसाची गुणवत्ता तपासली जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत महिला मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष; दोन जागांसाठी सात उमेदवार

Maharashtra Irrigation: राज्यातील पाणी वापर संस्थांची स्थिती चिंताजनक; निष्क्रिय संस्था बंद करायच्या का? विखे पाटलांचा सवाल

Nanded Farmer Death: १० हजारांचे कर्ज, ७० हजारांची मागणी; कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन् हत्या? फायनान्स कंपनीच्या कार्यालयात संशयास्पद मृत्यू

Crop Damage Panchnama: दोन हेक्टरच्या मर्यादेत पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश; शेतकऱ्यांच्या मदतनिधीला कात्री लागण्याची शक्यता

AI in Sugarcane Farming: ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढीवर मार्गदर्शन; दुष्काळी परिस्थितीत कृषी विभागाची जनजागृती मोहीम

SCROLL FOR NEXT