Washim News : जिल्ह्यात सहकार क्षेत्रात चर्चेत राहणाऱ्या रिसोड बाजार समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत विष्णुपंत भुतेकर यांची बिनविरोध निवड झाली. या पदासाठी विरोधी गटाकडून एकही अर्ज न आल्यामुळे भुतेकर यांची निवड घोषित करण्यात आली.
मागील चार दशकांपासून माजी खासदार अनंतराव देशमुख यांचे या बाजार समितीवर वर्चस्व आहे. मागील सव्वा वर्षाच्या कालखंडामध्ये यात बदल झाला होता. आता भुतेकर सभापती झाल्यामुळे पुन्हा एकदा अनंतराव देशमुख गटाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
३० एप्रिल २०२३ रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये देशमुख यांच्या सहकार विकास आघाडीचे १० संचालक निवडून आले होते. परंतु ऐनवेळी सहकार विकास आघाडीचे व विद्यमान आमदार अमित झनक यांच्या शेतकरी विकास आघाडीची संख्या समसमान झाली होती. त्यामुळे ईश्वर चिठ्ठीने संजय शिंदे हे सभापती तर राजाराम आरू हे उपसभापती बनले होते.
दीड वर्षाच्या कालखंडामध्ये येथील बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात धुसफुस वाढली होती. अखेर नाट्यमय घडामोडीनंतर सभापती संजय शिंदे यांनी १३ सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
त्यानंतर शेतकरी विकास आघाडीचे चार संचालक सहकार विकास आघाडीमध्ये दाखल होत मागील आठवडाभरापासून अज्ञात स्थळी रवाना झाले होते. शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार मंगळवारी (ता.२४) निवडणूक पार पडली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.