Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department: अखेर बदल्यांना मिळाला मुहूर्त

Group B officers Tranfers: महाराष्ट्र कृषी सेवेतील गट-ब तंत्र अधिकाऱ्यांच्या प्रलंबित बदल्यांना अखेर शासनाची मंजुरी मिळाली आहे. ‘ॲग्रोवन’च्या वृत्तामुळे प्रशासन खडबडून जागं झालं आणि ४३ अधिकाऱ्यांच्या बदल्या गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आल्या.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: महाराष्ट्र कृषी सेवेतील तंत्र अधिकारी गट ब च्या मुदतपूर्व विनंती बदल्या आणि समुपदेशनात बदल्यांमध्ये अंशत: बदल करत अखेर ४३ अधिकाऱ्यांच्या गुरुवारी रात्री बदल्या करण्यात आल्या. बदल्यांमधील सावळा गोंधळाबाबत ‘ॲग्रोवन’मधून वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर प्रशासनाने तातडीने प्रक्रिया पूर्ण करत रात्री सातनंतर शासन आदेश जारी करत संबंधित अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी तत्काळ रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.

माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बदल्यांचे अधिकार आयुक्त पातळीवर दिले आहेत. मात्र, समुपदेशन आणि विनंती बदल्यांमध्ये अनेकांना महत्त्वाची कारणे असूनही हव्या असलेल्या ठिकाणी बदल्या झाल्या नाहीत. परिणामी त्यांनी मंत्री कोकाटे यांच्याकडे दाद मागितली होती.

याबाबत सबळ कारणे पाहून संबधितांची मागणीच्या ठिकाणी बदली करावी असे आदेश दिले होते. मात्र, या प्रस्तावाला थंड बस्त्यात ठेवले गेले होते. तसेच काही अधिकाऱ्यांना विशेष हेतूने संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अखेर ‘ॲग्रोवन’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तातडीने फाइल हलली आणि बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.

संबंधित अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारची रजा मंजूर न करता पदस्थापनेच्या ठिकाणी तत्काळ हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बदल्या झालेल्यांमध्ये २४ अधिकाऱ्यांच्या बदलीच्या ठिकाणांमध्ये अंशत: बदल करण्यात आला आहे. तर एका अधिकऱ्याची पदोन्नतीने बदली केली आहे. १८ अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत.

यामध्ये तालुका कृषी अधिकारी, मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणी अधिकारी, तंत्र अधिकारी, जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर अंशत: बदलातील बदल्यांमध्ये तंत्र अधिकारी फलोत्पादन, तंत्र अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पुरवठा साखळी व मूल्य साखळीतज्ज्ञ तथा कृषी व्यवसाय सल्लागार, स्मार्ट तंत्र अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशीव यांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT