ST Bus Agrowon
ॲग्रो विशेष

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

MSRTC: एसटी महामंडळाच्या ४६८ बस मतदान यंत्रे व कर्मचारी वाहतुकीसाठी गुंतल्यामुळे १४२५ फेऱ्या रद्द झाल्या असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी अजय पाटील यांनी दिली.

Team Agrowon

Solapur News : एसटी महामंडळाच्या ४६८ बस मतदान यंत्रे व कर्मचारी वाहतुकीसाठी गुंतल्यामुळे १४२५ फेऱ्या रद्द झाल्या असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी अजय पाटील यांनी दिली. एसटी महामंडळाच्या बस मतदान प्रक्रियेत गुंतल्यामुळे मतदानासाठी गावोगावी जाणाऱ्या मतदारांना मात्र उमेदवारांनी केलेल्या सोयीवर अवलंबून राहावे लागले.

एसटी महामंडळाच्या बस मागील दोन दिवसांपासून निवडणुकीच्या कामासाठी गुंतल्या आहेत. मंगळवारी दुपारी मतदान यंत्रे व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर घेऊन जाणे आणि बुधवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान यंत्रे आणि कर्मचाऱ्यांना स्ट्राँगरुमपर्यंत पोचविण्यासाठी ४६८ बस दिल्या आहेत.

यामुळे एसटी एकूण १४२५ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या सोलापूर विभागात दररोज सुमारे दोन हजार आठशे फेऱ्या होतात. मात्र, एसटीच्या एकूण ५९३ बस पैकी ४६८ बस निवडणूक कामा व्यस्त असल्याने जवळपास पन्नास टक्के फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

उमेदवारांची यंत्रणा तगडी

मतदारसंघातून बाहेर गेलेल्या मतदारांना मतदानासाठी परत गावी आणण्यासाठी उमेदवारांनी तगडी यंत्रणा राबविली होती. पुणे शहरातून परत गावी येण्यासाठी आपापल्या मतदारसंघातील मतदारांसाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक मतदारांनी या यंत्रणेचा लाभ घेतला.

रेल्वेचा प्रवास हा खासगी बसपेक्षा सुखावह असल्याने पुण्याहून सोलापूरकडे येणाऱ्या अनेक मतदारांनी रेल्वेचा आधार घेतला आहे. मागील दोन दिवसांपासून अनेकजण पुण्याहून सोलापूरला परतले आहेत. सणासुदीला जसे नागरिक घरी परतात तसे मतदानासाठी अनेकजण गावी परतले आहेत.- राजाभाऊ जाधव, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

Soybean Market : केंद्राचे परिपत्रक तरीही राज्याचा निर्णय होईना

SCROLL FOR NEXT