Fertilizers Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Supply : खानदेशात खत पुरवठा रखडत

Fertilizer Shortage : खानदेशात खतपुरवठा मंजूर लक्ष्यांकाच्या तुलनेत कमी व रखडत सुरू आहे. यातच १०:२६:२६ खताची कृत्रिम टंचाई आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात खतपुरवठा मंजूर लक्ष्यांकाच्या तुलनेत कमी व रखडत सुरू आहे. यातच १०:२६:२६ खताची कृत्रिम टंचाई आहे. खानदेशात सुमारे दोन लाख टन खतांचा पुरवठा रब्बीत होणार आहे. ऑक्टोबरमध्ये रब्बी हंगाम सुरू झाला.

ऑक्टोबरमध्येही १०:२६:२६ ची टंचाई होती. परंतु नंतर ही समस्या कमी झाली. पुन्हा नोव्हेंबरमध्ये टंचाई होती. परंतु दरम्यान १०:२६:२६चा पुरवठा कंपन्यांकडून सुरळीत झाला. परंतु हा पुरवठा होवूनही कृत्रीम टंचाई खानदेशात आहे.

धुळ्यातील शिरपूर, धुळे, जळगावमधील रावेर, चोपडा, जामनेर, पाचोरा, जळगाव भागात १०:२६:२६ साठी शेतकऱ्यांनी एका कृषी निविष्ठा विक्रेत्याकडून दुसऱ्या विक्रेत्याकडे जावे लागते. यातच १० गोण्या हव्या असल्यास सात ते आठ गोण्या दिल्या जातात. त्यावरही लिकींग किंवा नको असलेली खते दिली जातात. यावर एक ते दीड हजार रुपये हकनाक खर्च होतो.

१०:२६:२६ चा पुरवठा मागील महिन्यात झाला आहे. कृषी विभागाकडे खतपुरवठा व त्याची उपलब्धता याबाबत सकारात्मक आकडेवारी आहे. परंतु कृत्रिम टंचाई काही प्रमुख शहरांत आहे. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे. खानदेशात केळी व भाजीपाला उत्पादक पट्ट्यात खतांची मोठी मागणी असते. परंतु ऐन हंगामात कृत्रिम टंचाई केली जाते.

जळगाव जिल्ह्यात सुमारे दीड लाख टन खतांचा पुरवठा रब्बीसाठी होणार आहे. त्यात ७० हजार टन युरियाचा समावेश आहे. पोटॅश, युरिया व डीएपी ही खते मुबलक आहेत. ती बाजारात मिळत आहेत. युरिया अधिकचा शिल्लक आहे.

त्याला उठाव नाही, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. खत पुरवठ्याची टक्केवारी बरी आहे. एकूण मंजूर लक्ष्यांकापैकी ४० टक्के खतांचा पुरवठा झाला आहे. त्यात फॉस्फेट, पोटॅश व युरियाचा पुरवठा बऱ्यापैकी असल्याची माहिती मिळाली.

एकाच कंपनीवर धाव

काही भागात एका विशिष्ट कंपनीच्या १०:२६:२६ ची मागणी आहे. त्याचा पुरवठा ज्या कृषी केंद्र, वितरकांकडे केला जातो, तेथून शेतकरी मागणी करीत आहेत. परंतु या केंद्रांत शेतकऱ्यांना १०:२६:२६ वर नॅनो युरिया घेण्याची सक्ती केली जात आहे.

तसेच काही केंद्रांत सी वीडबाबत सक्ती केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे. नंदुरबरातील शहादा, तळोदा भागातही हा प्रकार जोरात सुरू आहे. याला पर्याय म्हणून अनेक शेतकरी विद्राव्य खते घेत असून, आपला खतांवरील उत्पादन खर्च कमी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT