Fertilizer Seller  Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer License Cancellation : सोलापूर जिल्ह्यातील १२ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित

Fertilizer Seller Solapur : दुकानातील खतसाठा व पॉस मशिनमधील विक्री यामध्ये तफावत आढळल्याने सोलापूर शहरातील एका कृषी निविष्ठा विक्रेत्याचा खत विक्री परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे.

Team Agrowon

Solapur News : दुकानातील खतसाठा व पॉस मशिनमधील विक्री यामध्ये तफावत आढळल्याने सोलापूर शहरातील एका कृषी निविष्ठा विक्रेत्याचा खत विक्री परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे. तर अभिलेख पूर्ण नसलेल्या जिल्ह्यातील इतर ११ विक्रेत्यांचे परवाने असे १२ विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

खत विक्रीतील त्रुटी, अभिलेख पूर्ण नसणे, विक्री व साठ्यात तफावत असणे, यासारख्या गंभीर बाबी समोर आल्या. त्यामुळे या विक्रेत्यांचे परवाने काही काळासाठी निलंबित करण्यात आले आहे.

यामध्ये शहरातील बसवेश्वर कृषी केंद्राबाबत सातत्याने तक्रारी प्राप्त झाल्याने या दुकानाच्या खत विक्रीचा परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये इतर दोन विक्रेत्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.

जिल्हा भरारी पथक व तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. यापुढेही कारवाई सुरू राहील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

...या विक्रेत्यांवर झाली कारवाई

ओमसाई कृषी केंद्र (सादेपूर), जय मल्हार ॲग्रोटेक (पंढरपूर), अभिराज कृषी सेवा केंद्र (सोनके), धनश्री कृषी सेवा केंद्र (वडकबाळ), कट्टेवादेवी कृषी केंद्र (वडकबाळ), मनीषा ॲग्रो सेंटर (सोलापूर), महाराष्ट्र ॲग्रिकल्चर कन्सलटंसी (सोलापूर), शहा कृषी भांडार (करजगी), शेतकरी कृषी भांडार (वळसंग), सोमेश्वर कृषी केंद्र हत्तूर), मायक्का कृषी केंद्र (टाकळी).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop Insurance Compensation: सोयाबीन विम्याचे ११४६ कोटी मंजूर

Sugar Production Rises: साखर उत्पादनात सात टक्क्यांनी वाढ

Maha Annapurna Project: भात शेतीच्या कायापालटासाठी ‘महाअन्नपूर्णा प्रकल्प’

Drip Vendor Registration Issues: ठिबक विक्रेता नोंदणी रखडली

Vidarbha Heatwave: विदर्भात उष्ण लाटेची शक्यता

SCROLL FOR NEXT