Pik Vima Agrowon
ॲग्रो विशेष

Pik Vima : शेतकऱ्यांनी एक हजारांपेक्षा कमी नुकसान भरपाई मिळणार नाही, पीक विम्याची उर्वरित रक्कम सरकार देणार ; कृषिमंत्र्यांची घोषणा

Crop Insurance : पीक विमा योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याला किमान नुकसान भरपाई एक हजार पेक्षा कमी देऊ नये, असे राज्याचं धोरण आहे. त्यामुळे गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांना एक रुपयांपेक्षा कमी नुकसान भरपाई मिळाली. त्या संबंधित शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम देण्यात येणार आहे.

Team Agrowon

crop compensation : राज्यात एक रुपयात पीक विमा योजना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास पीक विमा कंपन्यांकडून एक हजार रुपयांपेक्षा कमी भरपाई देण्यात येणार नाही. तसेच मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांना कमी भरपाई देण्यात आली. त्या शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम राज्य सरकार देणार असल्याची घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केली.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (ता. ५) विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्याचा तारांकित प्रश्न उपस्थित केला. गेल्या हंगामात अवकाळी पाऊस आणि गारपीठसारख्या संकटामुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्याचा पीक विम्याचा मंजूर होऊन कंपन्यांकडून २ हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम देण्यास विलंब होत आहे. त्यांना व्याजासह भरपाई मिळणार का असा सवाल केला.

यावर उत्तर देताना कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास संबंधित विमा कंपन्यांना पीक विमा द्यावा लागणार आहे. पण कंपन्यांनी देण्यास टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बीड जिल्ह्यात दिरंगाई केलेल्या शेतकऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याची भूमिक घेतली होती. तोच बीड पॅटर्न यावर्षी संपूर्ण राज्यात लागू केला जाणार आहे. त्यामुळे ही पीक विमा शेतकऱ्यांच्या सर्वाहताने हिताची आहे.

तसेच काॅंग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी २०२२ मध्ये अवकाळी पाऊस, गारपीठमध्ये झालेल्या नुकसानीचे किती पंचनामे झाले आहे. ज्या शेतकऱ्यांना एक रुपयांपेक्षा कमी भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी पर्यंत मिळेल. यावर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सविस्तर उत्तर देत खरीप हंगाम २०२२ ची संपूर्ण आकडेवारी सभागृहासमोर मांडली. सन २०२२ मध्ये राज्यातील ९६ लाख ६१ हजार २१७ शेतकऱ्यांनी पीक विम्यामध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर आलेल्या नैसर्गिक आपत्तामुळे ६८ लाख ९५ लाख ४०५ शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र झाले. त्यापैकी ६५ लाख ७९ हजार शेतकऱ्यांना ३ हजार १४८ कोटी रुपये भरपाई देण्यात आली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना एक हजार रुपयांपेक्षा कमी भरपाई मिळाली आहे. त्यांना उर्वरित रक्कम राज्य सरकार देणार आहे.

राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी  पीक नुकसानीची माहिती विमा कंपनीला कळवण्याची मुदत ७२ तासांवरून ९६ तास करण्याची मागणी केली. यावर मुंडे यांनी पीक विम्यासाठी पूर्वसूचना वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT