Sericulture Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sericulture Farming : दुष्काळी भागात रेशीम शेतीला शेतकरी देणार प्राधान्य

Sericulture Department : रेशीम विभागातील अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने तालुक्यातील रेणूकाईवाडी येथे पहिल्यांदाच रेशीम शेतीची सुरुवात होत असून, सुमारे ३० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी कृषी विभागाकडे संमती दर्शवली आहे.

Team Agrowon

Nagar News : दुष्काळाशी सातत्याने सामना करणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील काही गावांत शेतकरी रेशीम शेती करण्याला प्राधान्य देणार आहेत. तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे तसेच रेशीम विभागातील अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने तालुक्यातील रेणूकाईवाडी येथे पहिल्यांदाच रेशीम शेतीची सुरुवात होत असून, सुमारे ३० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी कृषी विभागाकडे संमती दर्शवली आहे. रोजगार हमी योजनेतून रेशीम शेतीसाठी अनुदान दिले जात आहे.

जिल्ह्याच्या पूर्व भागातील पाथर्डी तालुक्यात बहुतांश गावात सातत्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. शेतीला शाश्‍वत पाणी नसल्याने कोरडवाहू शेती तसेच या भागात ऊसतोडणी कामगारांची संख्या मोठी आहे.

शेतकऱ्यांनी रेशीम रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिका तयार केल्या आहेत. रेणूकाईवाडी येथील शेतकऱ्यांनी नेवासा तालुक्यात जाऊन रेशीम शेती संदर्भात माहिती घेतली. तसेच कृषी विभाग व रेशीम विभाग यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना रेशीम बाबत प्रशिक्षण देण्यात आले.

सरपंच संदीप देशमुख, कृषी पर्यवेक्षक बाळासाहेब काकडे, कृषी सहायक प्रशांत गुंड, महेश घोरपडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. कृषी सहायक प्रशांत गुंड, शेतकरी रायभान मस्के, बापू देशमुख यांनी नेवासा येथील प्रवीण शेंडे, संदीप पवार या यशस्वी शेतकऱ्यांच्या शेतावरती प्रत्यक्ष भेटी देऊन याचा अभ्यास केला आहे. रेशीम शेती कशी फायदेशीर आहे, या संदर्भात माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.

रेणूकाईवाडी येथील शेतकऱ्यांनी रेशीम शेती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या परिसरातील रेशीम शेती यशस्वी ठरल्यास तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात या शेतीला वाव मिळेल व शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाचे साधन देखील मिळेल.
सुधीर शिंदे, तालुका कृषी अधिकारी, पाथर्डी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT