Farmer ID Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer ID : शेतकऱ्यांना मिळणार स्वत:चा ओळख क्रमांक

Greestack Concept : भारत सरकारची ‘ग्रीस्टॅक’ संकल्पना राज्यात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या संकल्पनेनुसार शेतकऱ्यासाठी तीन पायाभूत माहिती संच तयार करण्यात येणार आहेत.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : भारत सरकारची ‘ग्रीस्टॅक’ संकल्पना राज्यात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या संकल्पनेनुसार शेतकऱ्यासाठी तीन पायाभूत माहिती संच तयार करण्यात येणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांना स्वत:चा ओळख क्रमांक मिळणार आहे.

सद्यःस्थितीत भारत सरकारच्या मदतीने महाराष्ट्र राज्याचा शेतकरी माहिती संच तयार करण्यासाठी स्वयं नोंदणी संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे शेतकऱ्यांना स्वत:चा शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करता येईल व शेतकरी माहिती संचात समाविष्ट करता येणार आहे.

शेतकरी माहिती संच तयार करण्यासाठी www.mhfr.agristack.gov.in या संकेतस्थळाचा वापर करता येणार आहे. या संकेतस्थळावर कशा प्रकारे माहिती सादर करावयाची याबाबतचे सादरीकरण १६ डिसेंबरपासून राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत दिले जाणार आहे.

त्यानुसार या संकेतस्थळाचा वापर करून शेतकऱ्यांना स्वत:चा शेतकरी ओळख क्रमांक करता येणार आहे. तसेच शेतकरी ओळख निर्माण करण्याची कार्यवाही मोठ्या प्रमाणात होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रचार व प्रसार करावा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताची आधार संलग्न माहिती संच, हंगामी पिकांचा माहिती संच, भूसंदर्भिकृत भूभाग असणारे गाव नकाशे यांचा माहिती संच या बाबींचा समावेश यामध्ये असणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT