Agriculture Implements  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Implement Subsidy : सेस फंडातून ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना मिळणार अवजारे

Team Agrowon

Solapur News : जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांना पीक संरक्षण उपकरणे, ट्रॅक्टरचलित अवजारे, कृषी सिंचनासाठी सुधारित अवजार साधने ५० टक्के मर्यादित अनुदानावर डीबीटी तत्त्वावर देण्यात येणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत पंचायत समिती स्तरावर अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विकास अधिकारी नंदकुमार पाचकुडवे यांनी केले. या योजनेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अत्यल्पभूधारक व महिला शेतकऱ्यांना प्राधान्य राहील.

शेतकऱ्यांनी स्वत:चा सातबारा, आठ अ, आधार कार्ड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, तसेच लाभार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे असल्यास जातीचे प्रमाणपत्र व दिव्यांग लाभार्थीसाठी दिव्यांगत्वाच्या दाखल्याची झेरॉक्स प्रतीसह संबंधित पंचायत समितीकडे अर्ज करावेत.

लाभार्थ्यांची निवड केल्यानंतर शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत खुल्या बाजारातून अधिकृत विक्रेत्याकडून आपल्या पसंतीची अवजारे खरेदी करावी लागतील. खरेदी करावयाची अवजारे अधिकृत सक्षम तपासणी संस्थांनी परीक्षण करून ती बीआयएस अथवा अन्य संस्थांनी निश्‍चित केलेल्या प्रमाणकानुसार, तांत्रिक निकषांनुसार असावीत. अवजारांसाठी जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लक्ष्यांकानुसार सोडत पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.

शेतकऱ्यांनी ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत पंचायत समिती कार्यालयाकडे परिपूर्ण कागदपत्रांसह अर्ज करावेत, असे आवाहन श्री. पाचकुडवे यांनी केले.

स्प्रे-पंप, रोटाव्हेटर, वीडर, कडबाकुट्टी मिळणार

जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शेतकऱ्यांसाठी पिस्टन स्प्रे-पंप, नॅपसॅक बॅटरी ऑपरेटेड स्प्रे-पंप, ब्रश कटर, सोलार इन्सेंक्ट ट्रॅप, रोटाव्हेटर, पल्टी नांगर, रोटरी टिलर व वीडर, पेरणी यंत्र, कल्टी व्हेटर, पाच एचपी सबमर्सिबल पंपसंच, डिझेल इंजिन, कडबाकुट्टी, ताडपत्री, स्लरी इत्यादी साधने ५० टक्के मर्यादित अनुदानावर डीबीटी तत्त्वावर देण्यात येतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Serious Issues of Rape : लैंगिकतेचे शमन की दमन?

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

SCROLL FOR NEXT