Agriculture Implement : खरिपासाठी महिंद्राची रोटाव्हेटर श्रेणी उपलब्ध

Mahindra Farm Equipment : जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी असलेल्या महिंद्रा फार्म इक्विपमेंट सेक्टरने येत्या खरिपातील मशागत आणि आंतरमशागतीसाठी शेतकऱ्यांकडून रोटाव्हेटरच्या श्रेणीची वाढती मागणी पुरविण्यासाठी सज्ज झाली आहे
Mahindra Farm Equipment
Mahindra Farm EquipmentAgrowon
Published on
Updated on

Nagar News : जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी असलेल्या महिंद्रा फार्म इक्विपमेंट सेक्टरने येत्या खरिपातील मशागत आणि आंतरमशागतीसाठी शेतकऱ्यांकडून रोटाव्हेटरच्या श्रेणीची वाढती मागणी पुरविण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या खरीप हंगामातील भातासह विविध पिकांमध्ये काम करण्यासाठी ही रोटाव्हेटरची श्रेणी उपयुक्त असेल. गेल्या वर्षी हलक्या वजनाच्या मशागत यंत्राच्या विभागात महिंद्रा रोटाव्हेटर्सने यशस्वी पदार्पण केले आहे.

Mahindra Farm Equipment
Agriculture Electric Tractor : इलेक्ट्रिक ट्रॅक्टर जरूर आणा, पण...

महिंद्राच्या भारतीय संशोधन आणि विकास विभागाने रोटाव्हेटरची अवजड ते हलक्या वजनांपर्यंतची सर्वसमावेशक श्रेणी विकसित केली आहे. हे रोटाव्हेटर्स १५ ते ७० एचपी श्रेणीतील ट्रॅक्टर्ससाठी योग्य आहेत. या श्रेणीमध्ये अवजड विभागात महाव्हेटर सिरीज आणि महाव्हेटर एचडी (हेवी ड्यूटी) सिरीज आणि मध्यम विभागात सुपरव्हेटर सिरीज आणि हलके वजन विभागात गायरोव्हेटर सिरीज आणि पॅडीव्हेटर सिरीज यांचा समावेश आहे. तसेच लहान ट्रॅक्टर मालकांसाठी किंवा फळबागा शेतकऱ्यांसाठी मिनीव्हेटर सिरीजही उपलब्ध केलेली आहे.

Mahindra Farm Equipment
Agriculture Tractor : ट्रॅक्टरसोबत नांगराचे समायोजन करताना...

महिंद्राचे टिकाऊ बोरोब्लेड्स पाणथळ, कोरडवाहू जमीन, द्राक्षांचे मळे आणि फळबागांमधली माती चांगल्या प्रकारे उकरण्याची खात्री देतात. त्यांच्या स्थैर्य आणि टिकाऊपणाची वेगवेगळ्या शेतांत चाचणीद्वारे खात्री केलेली आहे. वेगवेगळ्या गिअरच्या कॉम्बिनेशनमुळे वेगाने फिरवता येतो आणि इंधन कार्यक्षमताही वाढते. यामुळे तण व्यवस्थापनासह विविध कामे योग्य प्रकारे करता येतात. या रेंजसाठी तीव्र हवामानातही चांगल्या प्रकारे टिकणारा उत्कृष्ट दर्जाचा पेंट वापरला असल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.

महिंद्राच्या या रोटाव्हेटर्स श्रेणीवर १ ते २ वर्षांची सर्वोत्तम उत्पादक वॉरंटीही देण्यात येत असून, ती अन्य उत्पादकांकडून दिल्या जाणाऱ्या सहा महिन्यांच्या वॉरंटीपेक्षा बरीच जास्त आहे. महाराष्ट्रात महिंद्राच्या रोटाव्हेटर्सची विक्री महिंद्रा ट्रॅक्टर वितरकांचे नेटवर्क आणि एक्सक्लुसिव्ह वितरकांद्वारे केली जाणार आहे. महिंद्रा फायनान्सद्वारे १०० टक्के आकर्षक कर्ज योजनाही उपलब्ध केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com