Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Forest Fodder : शेतकऱ्यांना मिळणार वनहद्दीतील गवत

Forest Area : यंदा पर्यन्यमान कमी असल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पाळीव जनावरांना चाऱ्याची कमतरता भासण्याची शक्यता असल्याने वनविभागाने त्यांच्या हद्दीतील गवत कापून नेण्याची मुभा शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

Team Agrowon

Pune News : यंदा पर्यन्यमान कमी असल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पाळीव जनावरांना चाऱ्याची कमतरता भासण्याची शक्यता असल्याने वनविभागाने त्यांच्या हद्दीतील गवत कापून नेण्याची मुभा शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. वनसंपत्तीला कोणतीही इजा न करता शेतकऱ्यांनी वनविभागातील गवत कापून घेऊन जावे, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

‘वन वणवे नियंत्रण वनसंपत्तीचे संरक्षण’ या विषयावर भोर वनविभागाची बैठक उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच पार पडली. या बैठकीस सहायक वनसंरक्षक भोर शीतल राठोड, नसरापूर वनपरिक्षेत्र अधिकारी संग्राम जाधव, भोर वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत, वेल्हे वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लुंगटे व सर्व वनकर्मचारी उपस्थित होते.

या वेळी वनवणव्यांच्या नियंत्रणासाठी वनहद्दीत जाळपट्टे तयार करणे, वणवे नियंत्रणासाठी पथक तयार करणे, वणव्यामुळे होणाऱ्या नैसर्गिक नुकसानीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे, या विषयावर चर्चा होऊन उपाययोजना करण्यास मान्यता देण्यात आली.

या वेळी यंदा दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांच्या गुरांना चारा कमी मिळणार असून वनहद्दीतील चारा उपलब्ध करून दिल्यास दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांना मदत होऊ शकेल, असा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रत्यक्ष जनावरांना वनहद्दीत चारण्यासाठी न आणता गुरांसाठी वनहद्दीतील गवत नेण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नसरापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी संग्राम जाधव यांनी सांगितले, की वणांमधील गवतामुळे वणवे पेटण्यास मदत होते व गवतामुळे वणवे आटोक्यात आणणे देखील शक्य होत नाही. शेतकऱ्यांना हे गवत कापण्यास परवानगी दिल्याने वनवणव्यांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

वनहद्दीतील गवत कापताना अशी घ्या काळजी...

कोणत्याही प्रकारे वनसंपत्तीचे नुकसान होणार नाही.

वनकर्मचाऱ्यांच्या नियंत्रणाखालीच हे गवत कापावे.

शेतकऱ्यांनी गवत कापताना कोणत्याही प्रकारे वणवा लागणार नाही, याची काळजी घ्यावी.

गवत सोडून इतर झाडांना कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT