Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Ajit Pawar : नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार- अजित पवार

Ajit Pawar Speech : राज्यातील शेतकऱ्यांची वीज बिल वसूलीसाठी कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडण्यात आल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत.

Team Agrowon

Maharashtra Farmer Scheme : नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर अनुदान मिळत नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी नियमात बसणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाईल, असं स्पष्ट केलं. त्यांच्या हस्ते मंगळवारी (ता.१५) कोल्हापूर येथे ध्वजरोहण करण्यात आलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलते होते.

अजित पवार म्हणाले, "जे शेतकरी तीन वर्ष नियमित कर्ज फेडतात त्यांना सरकार अनुदान देतं. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यास काही निधी कमी पडला होता. पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीत त्यासाठी मंजूर दिली आहे. ते मंजूर झाल्यामुळे जे नियमात बसतात त्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळेल. असं मी अर्थमंत्री म्हणून स्पष्ट सांगू इच्छितो."

राज्यातील शेतकऱ्यांची वीज बिल वसूलीसाठी कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडण्यात आल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, "शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे वीज कनेक्शन कुठे तोडले जात असेल तर मी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीसांशी त्यासंदर्भात बोलेल." असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

पवारांच्या भेटीचा खुलासा

शरद पवारांची लपून भेट घेतल्याच्या प्रश्नावर अजित पवार आक्रमकपणे बोलताना पाहायला मिळाले. चोरडिया यांच्या घरी शरद पवारांशी झालेल्या भेटी संदर्भातही अजित पवारांनी खुलासा केला. अजित पवार म्हणाले, मी शरद पवारांना लपून भेटायला गेलो नाही, मी उजळ माथ्यानं फिरणारा कार्यकर्ता आहे. मी पवार साहेबांचा पुतण्या आहे. त्यामुळे आमच्या भेटीतून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. शरद पवारांना दिवाळी-दसऱ्याला भेटलो, तरी त्याचा वेगळा अर्थ काढू नका. ती कौटुंबिक भेट असते. भेटीला राजकीय रंग देऊ नका. असं अजित पवार म्हणाले.

चोरडिया आणि पवार या दोन्ही कुटुंबांचे संबंध जुने आहेत. त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ काढू नका. चोरडिया यांच्या घरातून बाहेर पडताना ज्या गाडीचा अपघात झाला. त्या गाडी मी नव्हतो, असंही अजित पवारांनी सांगितलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT