Weekly Market Inauguration Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer’s Market Pune: कोथरूडमध्ये शेतकरी आठवडी बाजारचे उद्‌घाटन

Silkberry Fed Farmer Producer Company: २१ मे रोजी एफपीओ प्रोत्साहन योजनेअंतर्गत ‘नाफेड’ व सीबीबीओ एसआयआयएलसीच्या मार्गदर्शनाने स्थापन झालेल्या ‘सिल्कबेरी फेड शेतकरी उत्पादक कंपनी’च्या आठवडी बाजाराचे उद्घाटन उत्साहात पार पडले.

Team Agrowon

Pune News: केंद्र शासनाच्या १० हजार एफपीओ स्थापना व प्रोसाहन योजनेअंतर्गत ‘नाफेड’ आणि सीबीबीओ सिमासेस लर्निंग (एसआयआयएलसी) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या सिल्कबेरी फेड शेतकरी उत्पादक कंपनीच्या शेतकरी आठवडी बाजाराचे उद्‌घाटन २१ मे रोजी झाले.

गांधी भवनचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी आणि पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. रमेश शेलार यांच्या हस्ते फित कापून या आठवडी बाजाराचे उद्‌घाटन झाले. संत शिरोमणी सावतामाळी महाराज आठवडे बाजार अभियानांतर्गत कोथरूड-पुणे येथील गांधी भवनच्या मैदानावर हा आठवडी बाजार दर बुधवारी भरणार आहे.

शेतकरी गटांनी उत्पादित केलेला ताजा भाजीपाला थेट शहरातील ग्राहकापर्यंत रास्त दरामध्ये उपलब्ध करणे हा शेतकरी आठवडी बाजार सुरू करण्याचा हा मुख्य उद्देश असल्याचे सिल्कबेरी फेड फार्मर कंपनीचे संचालक विजय गारगोटे यांनी सांगितले.

परिसरातील नागरिकांनी या सेवेचा लाभ घेत थेट शेतकऱ्यांकडून उपलब्ध झालेला शेतीमाल खरेदी करण्याचे आवाहन कंपनीकडून करण्यात आले. पुणे शहरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी आठवडी बाजार उपक्रम चालणार आहे.

उद्‌घाटनप्रसंगी पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सिमासेस लर्निंगचे प्रकल्प व्यवस्थापक जयप्रकाश कुलकर्णी, धवलक्रांती फाउंडेशनचे डॉ. किशोर उढाण, श्रीकृष्ण गोशाळाचे रामदास घुले, आयडियल मीडियाचे आदेश टोपे, दत्तात्रय पोटवडे, सिल्कबेरीचे विठ्ठल सुकाळे, स्वप्नील टोपे, रामदास ढेरंगे, आनंद शिनगारे, सुनील टोपे व शेतकरी बांधव उपस्थित होते.

सिल्कबेरी आठवडी बाजाराचे वेळापत्रक

- बुधवार- गांधी मैदान, कोथरूड

- गुरुवार- बकाजी कॉर्नर बावधन

- शुक्रवार- मोशी

- शनिवार-रावेत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT