Loan Waive Waiting for the farmers Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waive : शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची प्रतीक्षा

Chhatrapati Shivaji Maharaj Sanman Yojna : भाजप-शिवसेना युती शासनाच्या काळात कर्जमुक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना जाहीर करण्यात आली होती. परंतू या योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालेलीच नाही.

Team Agrowon

Yavatmal News : भाजप-शिवसेना युती शासनाच्या काळात कर्जमुक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना जाहीर करण्यात आली होती. युती शासनानंतर महाविकास आघाडी सत्तेत आली. त्यानंतर पुन्हा सत्तांतर झाले.

योजना जाहीर झाल्यापासून तिसरे सरकार सत्तेवर आहे. मात्र, अजूनही छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालेलीच नाही.

भाजप-शिवसेना युतीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेतून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली. त्यासाठी प्रक्रिया राबविण्यात आली होती. ग्रीन लिस्टमध्ये आलेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात आले.

जिल्ह्यात आत्तापर्यंत २३ ग्रीनलिस्ट आल्यात. त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाला. युती सरकार जाऊन महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यांनी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली. या योजनेतून शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्यात आले. या योजनेला गती दिल्याने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे काम मागे पडले.

काही महिन्यांआधी राज्यात पुन्हा सत्तातंर झाले आहे. शिंदे-फडणवीस नवे सरकार सत्तेत आले आहे. असे असतानाही अजूनही ग्रीन लिस्ट पुढे सरकलेली नाही. तेव्हापासून जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेलाच नाही.

तिसरे सरकार पण कर्जमाफी नाही

युती सरकारनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यांनीही कर्जमाफी जाहीर केली. महाविकास आघाडीचे अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर राज्यात सत्तातंर झाले आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळून त्यांच्या जागी शिंदे-फडणवीस हे नवे सरकार आले आहे. यांच्या काळात तरी कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT