File Photo Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Protest: हरियाणा, पंजाब, राजस्थानमध्ये शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा; हमीभाव कायद्याच्या मागणीवर ठाम

मागील सहा महिन्यांपासून शेतकरी हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी ताकद दाखवली आहे. सरकारने शेतकऱ्यांची ताकद कमी आहे असं समजू नये, असंही पंढेर म्हणाले.

Dhananjay Sanap

संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि किसान मजूर मोर्चाने गुरुवारी (ता.१५) पंजाबमधील वाघा सीमेवर ट्रॅक्टर मोर्चा काढला. तर हरियाणा, राजस्थान आणि उत्तरप्रदेशमध्येही काही जिल्ह्यात शेतकरी मोर्चा काढण्यात आला. तसेच शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाहीत, अशी भूमिका खनौरी सीमेवर संयुक्त किसान मोर्चाचे जगजीतसिंह डल्लेवाल यांनी जाहीर केली.

संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि मजूर मोर्चाने हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी १३ फेब्रुवारी २०२४ पासून 'दिल्ली चलो' पुकारलं आहे. परंतु हरियाणा राज्य सरकारने आंदोलक शेतकऱ्यांना सीमेवर रोखलेलं आहे. त्याचा निषेध करत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला. यामध्ये हजारो शेतकरी सामील झाल्याचा दावा शेतकरी संघटनांनी केला आहे.

किसान मजूर मोर्चाचे नेते सरवणसिंह पंढेर यांनीही मागण्यावर ठाम असल्याचं जाहीर केलं. ते म्हणाले, "मागील सहा महिन्यांपासून शेतकरी हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी ताकद दाखवली आहे. सरकारने शेतकऱ्यांची ताकद कमी आहे असं समजू नये." असंही पंढेर म्हणाले.

दरम्यान, हरियाणा सरकारला न्यायालये सीमा खुल्या करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सीमा खुल्या झाल्यानंतर शेतकरी दिल्लीकडे कूच करतील. तसेच ट्रॅक्टर-ट्रॉली दिल्ली चलो मोर्चा पुन्हा सुरू करण्यात येईल. आम्ही सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना दिलेल्या निर्णयाची कार्यवाही कधी केली जाते याची आम्ही वाट पाहत आहोत, असंही पंढेर म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कांदा भाव दबावातच, झेंडूला उठाव, कापूस आवक सुधारली, मका भाव घसरले तर गव्हाचे दर टिकून

Shivrajya Abhishek Dinotsav: स्वराज्यभूमीत प्रकाशाचा उत्सव

Flood Relief: धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तारेवरची कसरत

Agricultural Value Chain: कृषी मूल्य साखळीमध्ये लहान शेतकऱ्यांचा सहभाग

Panand Roads: लातूरमध्ये दीडशे पाणंद रस्त्यांना मंजुरी

SCROLL FOR NEXT