Milk Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Subsidy : सात रुपये प्रतिलिटर दूध अनुदानाचा शेतकऱ्यांना मिळणार मोठा लाभ

Farmers Benefits : राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघ व खासगी दूध प्रकल्प यांना गाय दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर सात रुपये अनुदान देण्यात येत आहे.

Team Agrowon

Latur News : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी दूध खरेदी दराच्या चढ-उतारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या अनुषंगाने राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघ व खासगी दूध प्रकल्प यांना गाय दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर सात रुपये अनुदान देण्यात येत आहे. याचा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी एम. एस. लटपटे यांनी केले आहे.

सहकारी दूध उत्पादक संघ व खासगी दूध प्रकल्पांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध गुणप्रत ३.५, ८.५ फॅट, एसएनएफ या गुणप्रतीच्या दुधासाठी प्रति लिटर २८ रुपये दूध खेरदी दर देणे आवश्यक आहे. तसेच कमीत कमी ३.२ फॅट, ८.३ एसएनएफपर्यंत गुणप्रत असलेल्या दुधासाठी ही योजना लागू आहे.

तसेच ३.५, ८.५ फॅट, एसएनएफ या गुणप्रतीपेक्षा प्रति पॉइंट कमी-अधिक होणाऱ्या फॅट व एसएनएफसाठी प्रत्येकी ३० पैसे वजावट, अधिक करण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेले असून, अनुदान पात्र गाय दुधासाठी प्रति लिटर ७ रुपये अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे.

डीबीटी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते, आधार कार्ड व दुधाळ जनावरांचे करण्यात आलेली ईआर टॅगिंग ही भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. दूध अनुदान योजनेच्या २६ सप्टेंबर, २०२४ च्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील कार्यान्वित असलेले सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणारा एकही दूध उत्पादक शेतकरी योजनेपासून वंचित राहू नये,

यासाठी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्ह्याच्या जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालय व जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गाय, म्हैस यांची ईआर टॅगिंग करून भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी करण्याबाबतची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्वच दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपापल्या गावालगतच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cultivation: अमेरिकेत सोयाबीन लागवड वाढणार

Jowar Arrival Increase: अहिल्यानगरला ज्वारीच्या आवकेत वाढ

Krushi Mitra Recruitment Scam: ‘कृषिमित्र’ नावाखाली बोगस भरतीचे पेव

Maharashtra Heatwave: कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा कायम

Bordeaux Paste: फळझाडांसाठी बोर्डो पेस्ट घरच्या घरी कसे बनवावे?

SCROLL FOR NEXT