Agriculture Water Supply Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : रात्रीच्या वीजपुरवठ्याला कंटाळले शेतकरी

Farmer Issue : सातत्याने रात्री मिळत असलेल्या वीज पुरवठ्याला शेतकरी कंटाळले असून दिवसभर कामानंतर पुन्हा रात्रभर जागरण करीत पीक वाचवण्याची शेतकरी धडपड करीत आहे.

Team Agrowon

Akola News : शेतीला दिवसा अत्यंत कमी वीजपुरवठा मिळत असून शेतकऱ्यांना सिंचनासाठी रात्री दोन वाजता जिवावर उदार होऊन कृषिपंप सुरू करण्यासाठी जावे लागते आहे. सातत्याने रात्री मिळत असलेल्या वीज पुरवठ्याला शेतकरी कंटाळले असून दिवसभर कामानंतर पुन्हा रात्रभर जागरण करीत पीक वाचवण्याची शेतकरी धडपड करीत आहे.

दिवसा वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना रात्री दोन वाजता शेतात जावे लागते. तेल्हारा तालुक्यात सिंचनाच्या सुविधा असल्याने शेतकरी वर्षभर पिके घेतात. यावर्षात खरीप तसेच रब्बीतही पाहिजे तितके उत्पादन झालेले नाही. सुरुवातीला सोयाबीन, मूग, उडीद व नंतर मॉन्सूनोत्तर पावसामुळे कपाशी पिकाचे नुकसान झाले.

ढगाळ वातावरणामुळे कपाशीवर बोंडअळी आली. अशा पद्धतीने पिकांचे नुकसान झाले. धुक्यामुळे काही शेतकऱ्यांच्या कांदा पिकावर करपा येऊन पीक जळाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी ज्वारी, गव्हाची पेरणी केली. मात्र भारनियमनाच्या वेळेनुसार शेतकऱ्यांना रात्री दोन वाजता पिकाला पाणी द्यावे लागते आहे.

वीज वितरण कंपनीच्या नियमानुसार तालुक्यात दर एक महिन्यामध्ये केव्हा रात्री तर केव्हा दिवसा वीज मिळते. सध्या एका आठवड्यात चार दिवस रात्री दोन वाजता वीज येते. त्यामुळे रात्री दोन वाजता कृषिपंप सुरू करावा लागतो. स्प्रिंकलरचे पाइप बदलावे लागतात.

मी लागवण पद्धतीने पाच एकर शेती केली. त्या शेतात कपाशीची लागवड केली होती. बोंडअळीने पिकाची हानी झाली. पीक उत्पादन घटले. सध्या पाच एकरांत ज्वारी पेरणी केली. मात्र वीज रात्री दोन वाजता येत असल्याने पीक उत्पादनासाठी रात्री जागरण व जिवावर उदार होऊन पाणी द्यावे लागते आहे.
सिद्धार्थ हिवराळे, शेतकरी, तळेगाव खुर्द, जि. अकोला
मी या आधी शेतात कपाशी लागवड केली. मात्र पावसामुळे पिकांचे उत्पादन घटले. आता गहू, ज्वारी पेरणी केली आहे. सध्या वीज रात्री मिळत असल्याने जागरण करून पिकांना पाणी द्यावे. शासनाने दिवसा वीजपुरवठा कसा देता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे.
सुदेश शेळके, शेतकरी, चांगलवाडी, ता. तेल्हारा, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT