agrowon
ॲग्रो विशेष

Minister Dada Bhuse : मंत्री दादा भुसेंच्या ताफ्यावर शेतकऱ्यांनी फेकला कापूस; हमीभावाची केली मागणी

Amaravati Collector : अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनादरम्यान मंत्री दादा भुसे आले, यावेळी आंदोलनकर्त्यांनी मंत्री भुसे यांच्या ताफ्यावर कापूस, तूर, सोयाबीन फेकले.

sandeep Shirguppe

Shivsena Thackeray Group : अमरावतीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनादरम्यान मंत्री दादा भुसे आले, यावेळी आंदोलनकर्त्यांनी मंत्री भुसे यांच्या ताफ्यावर कापूस, तूर, सोयाबीन फेकले. शेतमालाला भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी केली. दादा भुसेंच्या वाहनावर कापूस फेकल्याने काही काळ वातावरण तणावाचे बनले होते.

अमरावतीचे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पराग गुधडे कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट उघडून आत घुसले. यावेळी शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर आणि गहू सोबत आणले होते. दरम्यान मंत्री दादा भुसे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. तेव्हा आंदोलनकर्त्यांनी दादा भुसे यांच्या ताफ्यातील वाहनांवर कापूस, तूर, सोयाबीन फेकले.

हमीभावाने सोयाबीन विक्रीचा आज शेवटचा दिवस आहे. शेतमालाला अपेक्षित हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत राज्यातील काही ठिकाणी शेतकऱ्यांनी याविरोधात आंदोलनही केले आहे. सोयाबीनला ८ हजार, कापसाला १० हजार, तूरीला प्रति क्विंटल १२ हजार भाव देण्याची मागणी करण्यात येत आहे.

पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचून ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी सरकारच्या विरोधार जोरदार घोषणाबाजी केली. यादरम्यान पोलिस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये सौम्य बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे.

नाना पटोलेंची मुदत वाढीची मागणी

"राज्यातील विशेषकरून विदर्भ व मराठवाड्यातील सोयाबीन शेतकऱ्यांकडे अद्याप लाखो क्विंटल सोयाबीन पडून आहे. ६ फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. परंतु या कालावधीत शेतकऱ्यांकडील सर्व सोयाबीन खरेदी होणार नाही, राज्य व केंद्र सरकारने शेतकऱ्यांकडून सर्व सोयाबीन खरेदी करेपर्यंत ही खरेदी केंद्रे सुरु ठेवावीत वेळप्रसंगी खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी". अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain : दिवाळीच्या सणावर संकटाचे ढग

Farmer Relief : पूर्व विदर्भामध्ये ५६ हजारावर शेतकऱ्यांना मदतनिधीची प्रतीक्षाच

Sugar MSP : केंद्राने साखरेची किमान विक्री किंमत ४३०० रुपये करावी

Paddy Harvesting : भुदरगडमध्ये भात कापणीला वेग

Tiger Terror : वाघाच्या दहशतीने शेतीकामेच रखडली

SCROLL FOR NEXT