Electricity Connection Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity Connection : कृषिपंप वीज संयोजनासाठी शेतकऱ्यांची वणवण

Farmer Struggle : खानदेशात पाच ते सात अश्वशक्तीच्या पंपांचे वीजबिल माफ केल्याचे दाखले, बिले वितरण वीज कंपनीने गावोगावी केले. परंतु अनेक लहान शेतकरी कृषिपंपांच्या वीज संयोजनासाठी वणवण करीत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात पाच ते सात अश्वशक्तीच्या पंपांचे वीजबिल माफ केल्याचे दाखले, बिले वितरण वीज कंपनीने गावोगावी केले. परंतु अनेक लहान शेतकरी कृषिपंपांच्या वीज संयोजनासाठी वणवण करीत आहे. वीज शेतीसाठी मिळत नसल्याने बागायतीला अडसर येत आहे.

अनेक शेतकरी मागील वर्षभरापासून विजेची मागणी करीत आहेत. अर्ज, वीज मागणी प्रस्ताव दिले. शुक्ल भरण्याची तयारी केली. परंतु मागील उन्हाळ किंवा रब्बी हंगामातही वीज संयोजन मिळाले नाही.

आता या रब्बीतही विजेसाठी शेतकरी भटकंती करीत आहेत. जळगाव, धुळे सुमारे अडीच हजार नवे वीज संयोजन मागणीचे प्रस्ताव रखडले आहेत. शासकीय विहीर योजनांचे लाभार्थीदेखील विजेची मागणी करीत आहेत. वीजबिल माफी केली जाते. पण नवे संयोजन का पाच व साडेसात अश्‍वशक्तीसाठी दिले जात नाही, असा प्रश्‍न शेतकरी करीत आहेत. शेतकरी आपली शेती सिंचनाखाली आणण्यासाठी विहिरी, कूपनलिका तयार करतात.

परंतु नवे रोहित्र घ्यावे लागेल, संबंधित भागातील रोहित्रावर नवे संयोजन जोडता येणार नाही, तशी परवानगी नाही, नव्या रोहित्रासाठी एक लाख रुपये खर्च येईल, अशी बतावणी वीज वितरण कंपनीमधील काही एजंट करतात. शेतकऱ्यांची अडचण अधिकची वाढत असून, ही समस्या कोणाकडे सांगावी व मार्ग कसा काढावा, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे.

या समस्येची दखल घ्यायला अधिकारी तयार नाहीत वीज वितरण कंपनीतर्फे विजेची उपलब्धता, सतत किंवा शासनानुसार अवर्षणप्रवण भागातील अतिपाणी उपसा अशी कारणे सांगून शेतकऱ्यांना नवे वीज संयोजन कृषिपंपांना दिले जात नसल्याची माहिती आहे. शेतकरी कूपनलिका किंवा विहिरीला वीज संयोजन नसल्याने घेऊ शकले नसल्याने बागायती शेती करणेही अशक्य झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT