Onion Rate agrowon
ॲग्रो विशेष

Onion Rate : कांद्याचे दर गडगडल्यामुळे बेळगाव बाजारसमितीत शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

Onion Rate Belgaum : ४ ते ४ हजार ५०० रुपये दर असलेला कांदा २ हजार ५०० ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटलवर आला. त्यामुळे शेतकऱ्यांतून प्रचंड नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा पावित्रा घेतला.

sandeep Shirguppe

Onion Rate Market : बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन कांद्याचा दर गडगडल्यामुळे सोमवारी (ता. २८) शेतकऱ्यांनी मुख्य प्रवेशद्वार बंद करून आंदोलन केले. दुपारी १२ वाजता सुरू झालेले आंदोलन सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चालले. दर अचानक १ हजार ते १५०० रुपयांनी घसरल्यामुळे विजापूर, बागलकोटसह महाराष्ट्राच्या सीमाभागातील नवीन कांदा घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. आंदोलनस्थळी बाजारसमितीचे अधिकारी व पोलीस दाखल झाले. त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांची समजूत काढली. परंतु, शेतकरी आंदोलनावर ठाम होते.

अखेर सायंकाळी ५.३० च्या दरम्यान आंदोलन मागे घेण्यात आले. दर्जानुसार कांद्याचा दर वाढवून देण्याचा निर्णय या बैठकीत झाला. त्यानुसार व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना दर वाढवून दिला.

यंदा ऑक्टोबरमध्येही जोरदार पाऊस झाला, त्यामुळे कर्नाटकातील विजापूर व बागलकोट भागांतील शेतकऱ्यांचा कांदा ओला झाला आहे. कांदा दर्जेदार नसल्यामुळे लवकर खराब होत आहे. त्यामुळे या कांद्याचा दर अचानक कमी झाला आहे. एपीएमसीचा बाजार प्रत्येक बुधवारी व शनिवारी होतो. मात्र, कांदा खराब असल्यामुळे (ता.२८) पुन्हा सवाल केला. यावेळी ४ ते ४ हजार ५०० रुपये दर असलेला कांदा २ हजार ५०० ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटलवर आला. त्यामुळे शेतकऱ्यांतून प्रचंड नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा पावित्रा घेतला.

शनिवारी चांगला दर असल्यामुळे शेतकऱ्यांनी सोमवारीही चांगला दर मिळेल, या आशेने कांदा मोठ्या प्रमाणात आणला होता. मात्र, पुन्हा लिलाव झाल्यामुळे कांदा दर गडगडला. बाजारात फक्त नवीन कांद्याचा दर गडगडला होता. जुन्या कांद्याला चांगला दर होता. बेळगावातील कांदा दिल्ली, मध्य प्रदेशसह विविध राज्यांत जातो.

नवीन कांदा लवकर खराब होत असल्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी नवीन कांदा खरेदी केला नाही. तसेच काहींनी कमी दरात कांदा खरेदी केला. कमी दर मिळाल्यामुळे शेतकरी नाराज झाले. यावेळी बाजारसमितीचे अधिकारी निरंजन हिरेमठ, स्वप्नील तोडकर, पोलीस निरीक्षक ए. एस. अवटी, मंजुनाथ बजंत्री, त्रिवेणी रायकर आदी अधिकाऱ्यांनी यावर तोडगा काढत आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले.

वाहनांच्या लांबच लांब रांगा

प्रवेशद्वार बंद करून आंदोलनाला सुरुवात केली. यामुळे बाहेरच्या शेतकऱ्यांना आत जाता आले नाही. तसेच आतमध्ये किरकोळ बाजाराला गेलेल्या नागरिकांना मनस्ताप झाला. एपीएमसीचे दुसरे प्रवेशद्वारदेखील बंदच होते. प्रवेशद्वार बंद असल्यामुळे एपीएमसी पहिल्या प्रवेशद्वारापासून बॉक्साईट रोड व दुसऱ्या बाजुला कंग्राळी गावापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune APMC: पुणे बाजार समितीच्या नवीन फुलबाजाराचे काम संथ गतीने

IAS Varsha Ladda: कृषी शिक्षण परिषदेच्या महासंचालकपदी वर्षा लड्डा

Sharad Pawar: आणीबाणीवर सत्ताधाऱ्यांनी टीका करू नये: शरद पवार

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीवर प्रशासक की राष्‍ट्रीय बाजार?

Pandharpur Darshan: ‘व्हीआयपी’ दर्शन बंद केल्याने, १५ तासांचे दर्शन ५ तासांवर

SCROLL FOR NEXT