Pradip Ambre Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Son Success: शेतकरीपुत्र प्रदीप आंबरेची यशाला गवसणी

Rural Success Story: अल्पभूधारक शेतकरी कुटुंब. शेतीत कुटुंबाचा खर्च भागत नाही म्हणून वडील मजुरी करतात अन् आई विडी कामगार. आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या गणोरे (ता. अकोले) येथील आंबरे कुटुंबातील प्रदीपने थेट यशाला गवसणी घातली.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News : अल्पभूधारक शेतकरी कुटुंब. शेतीत कुटुंबाचा खर्च भागत नाही म्हणून वडील मजुरी करतात अन् आई विडी कामगार. आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या गणोरे (ता. अकोले) येथील आंबरे कुटुंबातील प्रदीपने थेट यशाला गवसणी घातली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत ६३१ विद्यार्थ्यांत राज्यात पहिला क्रमांक मिळवत सहायक आयुक्त (अन्न) पद मिळवले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील पश्चिम भागातील गणोरे येथील वसंतराव व ताराबाई आंबरे यांचे कुटुंब. एक मुलगा, चार मुली. घरी केवळ दीड एकर शेती. दीड एकर शेतीत कुटुंब चालवताना होणारी आर्थिक कसरत पेलावत वसंतरावांनी विहिरीची कामांवर मजुरी केली. या भागात फळबागांची संख्या बऱ्यापैकी आहे. त्यामुळे फळबाग छाटणीची कामेही करतात. ताराबाई विडी कामगार आहेत.

आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करावा लागत असला तरी आंबरे कुटुंबाने मुली आणि मुलाच्या शिक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष होऊ दिले नाही. रंजना शहाणे, वैशाली गडाख, सुरेखा खांडेभराड आणि आशा गडाख या चारही मुलींना उच्चशिक्षण दिले. सुरेखा खांडेभराड उच्च शिक्षणानंतर बॅंकेत चांगल्या पदावर नोकरीला आहेत. प्रदीप याचे चौथीपर्यंत शिक्षण गणोरेत जिल्हा परिषद शाळेत तर दहावीपर्यंत शिक्षण येथीलच शिवाजी विद्यालयात झाले. संगमनेरच्या श्रमिक विद्यालयात बारावीपर्यंत, बीड येथे बीटेक कृषी अभियांत्रिकी, महात्मा फुले कृषी विद्यापीठात एमटेक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.

सरकारी अधिकारी होण्याचे आणि उच्च पदावर जाण्याची जिद्द बाळगून प्रदीप तयारी करीत होता. महात्मा फुले कृषी विद्यापीठात राहुरी ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग फोरम तसेच चुलत भाऊ भाऊसाहेब आंबरे यांनीही मदत केली. वडील वसंतराव, आई ताराबाई आणि बहिणींचेही पाठबळ मिळत राहिले.

आर्थिक स्थितीशी संघर्ष करत प्रदीपने राज्यसेवा, कृषी सेवा आणि आयकर अशा वेगवेगळ्या सहा परीक्षा दिल्या. सातव्यांदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत केवळ उत्तीर्णच झाला नाही तर मुख्य परीक्षेत ६१३ विद्यार्थ्यांतून राज्यात पहिला क्रमांक मिळवत राजपत्रित अधिकारी सहायक आयुक्त (अन्न) हे पद मिळवले आहे. गणोरे सारख्या दुर्गम, ग्रामीण भागातील एका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील तरुणाने यशाला गवसणी घातली आहे.

संघर्षातून बरेच शिकता येते, पुढे जाता येते. माझ्या आईवडिलांनी प्रतिकूल परिस्थितीत मला शिकवले. लढायला बळ दिले म्हणून मला पुढे जाता आहे. मला वेगवेगळ्या सहा परीक्षेनंतर यशस्वी होता आले. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्‍वास ठेवून अभ्यास केला तर यश दूर नाही.
प्रदीप वसंत आंबरे, गणोरे (ता. अकोले, जि. अहिल्यानगर) मो. ९१६८०३५६८७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT