Organic Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Farming : सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा

Aatma Project : शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. जत तालुक्यात सेंद्रिय शेती करण्यासाठी वाव आहे, असे मत आत्मा प्रकल्प संचालक जाबुवंत घोडके यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Sangli News : सेंद्रिय शेतीची काळाची गरज आहे. त्यामुळे शासनाने सेंद्रिय शेतीचे धोरण आखले आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. जत तालुक्यात सेंद्रिय शेती करण्यासाठी वाव आहे, असे मत आत्मा प्रकल्प संचालक जाबुवंत घोडके यांनी व्यक्त केले.

करजगी (ता. जत) येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा, अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) २०२३-२४ अंतर्गत गाव पातळीवरील शेतकरी प्रशिक्षण पार पडले. या वेळी घोडके बोलत होते.

घोडके म्हणाले, की रासायनिक शेतीमुळे जमिनीची सुपीकता कमी होत असून खर्चाची वाढ होत आहे. शासनाने सेंद्रिय शेती बाबत धोरणे तयार केली आहेत. सेंद्रिय शेतीचे प्रमाणिकरण व त्यासंबंधीचे रेकॉर्ड जतन केले जाणार आहेत. त्यामुळे सेंद्रिय उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होईल.

या शिबिरात स्वनिर्मित सेंद्रिय पद्धतीची पीक वृद्धीवर्धक, शेतातील कीड व रोग निरीक्षण व सर्वेक्षण, सेंद्रिय प्रमाणिकरण मानके, शेतकरी दैनंदिनित नोंद करणे, पुढील हंगामाची पूर्वतयारी व नियोजन आदी विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले. कामगंध सापळे, निळे व पिवळे चिकट सापळे, पक्षी थांबे, दशपर्णी अर्क, अमिल अर्क, पाच टक्के निंबोळी अर्क, लमीत अर्क, ब्रह्मास्त्र, जीवामृत आदी निविष्ठानिर्मिती आदीविषयी माहिती देण्यात आली. या वेळी शेतकरी दैनंदिनीचे वाटप करण्यात आले.

या वेळी उपप्रकल्प संचालक, आत्मा, सांगली राजाराम खरात, ज्ञानयोगी सिद्धेश्वर स्वामीजी हायस्कूलचे संस्थापक चेअरमन रेवाप्पा चन्नाप्पा पट्टणशेट्टी, हायस्कूलचे मुख्याध्यापक शैलेंद्र अरळी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक जत रविकरण पवार, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक राजेंद्र डोळी, अमसिद्ध हंजगी, शेतकरी लाभार्थी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration: भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी धोकादायक; घरच्या घरी तपासा दुधातील भेसळ

River Linking Project: दुष्काळमुक्तीकडे वाटचाल, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला ७८ टीएमसी पाणी मिळणार- मुख्यमंत्री फडणवीस

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस स्थिर, टोमॅचो आवक सुधारली, डाळिंबाला उठाव, मिरचीला उठाव टिकून

Land Acquisition: ‘शक्तिपीठ’साठी पारदर्शक भूसंपादन हवे

NA Permission Rule: शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी ‘NA’ परवानगीची अट रद्द ; राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT