Agriculture Warehouse  Agrowon
ॲग्रो विशेष

Warehouse Receipt Scheme : शेतकऱ्यांनी गोदाम पावती योजनेचा लाभ घ्यावा

Wakhar Mahamandal : शेतकऱ्यांनी गोदाम पावती योजनेचा लाभ घेऊन आपल्या उत्पन्नात वाढ करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अमरावती विभागीय व्यवस्थापक अजित मासाळ यांनी केले.

Team Agrowon

Akola News : शेतकऱ्यांनी गोदाम पावती योजनेचा लाभ घेऊन आपल्या उत्पन्नात वाढ करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अमरावती विभागीय व्यवस्थापक अजित मासाळ यांनी केले.

वखार महामंडळाच्या गोदामात ‘वखार आपल्या दारी’ अभियानाला बुधवारी (ता.१८) मूर्तिजापूर येथे प्रारंभ झाला. यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ व जागतिक बँक अर्थ सहाय्यित स्मार्ट प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने वखार आपल्या दारी या अभियानाची पहिली कार्यशाळा घेण्यात आली.

यावेळी केंद्र प्रमुख अमोल पदमुले, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अकोला शाखेचे व्यवस्थापक माधव मांगटे, स्मार्ट प्रकल्पाचे जिल्हा व्यवस्थापक पुंडलिक धामाडे, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे राज्य व्यवस्थापक प्रशांत चासकर (पुणे), अमरावती विभागीय व्यवस्थापक दीपक बेदरकर, यांच्यासह उमेद अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक व महिला बचत गटांचे प्रतिनिधी, शेतकरी, शेतकरी कंपनी, सहकारी संस्था, महिला बचत गट व त्यांच्या फेडरेशनचे पदाधिकारीही उपस्थित होते.

आज वरूड येथे कार्यशाळा

अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर व लातूर या विभागातील १२ जिल्ह्यांमध्ये १३ ठिकाणी वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये एक दिवसीय कार्यशाळा होत आहे. दुसरी कार्यशाळा आज (ता.१९) वरूड (जि.अमरावती) येथे होईल. शुक्रवारी (ता.२०) काटोल, जि. नागपूर,

शनिवारी (ता.२१) आर्वी, जि. वर्धा, सोमवारी (ता.२३) वरोरा जि. चंद्रपूर, बुधवार (ता.२५) वणी जि.यवतमाळ, गुरुवार (ता.२६) वडसा जि. गडचिरोली, १ नोव्हेंबर औसा जि. लातूर, २ नोव्हेंबर अहमदपूर जि. लातूर, ३ नोव्हेंबर लोहा जि. नांदेड, ४ नोव्हेंबर मानवत जि. परभणी, ६ नोव्हेंबर माजलगाव जि. बीड आणि ७ नोव्हेंबर वैजापूर, छ.संभाजीनगर येथे कार्यशाळा होत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत करणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT