Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season : शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे योग्य नियोजन करावे : भाऊसाहेब रुपनवर

Kharif Season Sowing : 'खरीप हंगाम मोहीम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी खत बचत व हुमणी नियंत्रण करून पिकाची उत्पादकता वाढवा.

Team Agrowon

Indapur News : 'खरीप हंगाम मोहीम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी खत बचत व हुमणी नियंत्रण करून पिकाची उत्पादकता वाढवा. यासाठी कृषी विभागातर्फे माहिती घ्यावी,' असे आवाहन तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर केले.

काटी (ता. इंदापूर) येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात शेतकऱ्यांना रूपनवर यांनी मार्गदर्शन केले. इंदापूर तालुक्यामध्ये खरीप हंगामातील प्रमुख पिके म्हणून मका, बाजरी, तूर, सोयाबीन, मूग याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

ऊस लागवडीकडे सुद्धा शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरिपातील योग्य नियोजन हंगाम सुरू होण्याच्या अगोदरच करावे,' असे मत रूपनवर यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया, खताची बचत होण्यासाठी व उत्पादन खर्च कमी करण्यासाठी बीज प्रक्रिया करणे फायदेशीर असल्याचे यावेळी रूपनवर यांनी सांगितले.

तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने पहिला पाऊस पडल्यानंतर जमिनीतील हुमणीचे भुंगेरे लिंब व बाभूळ यांचे पाने खाण्यासाठी बाहेर येतात.

अशावेळी प्रकाश सापळे जमिनीवर खड्डा घेऊन त्यामध्ये प्लास्टिक टाकून पाण्याने भरावे व त्यामध्ये थोडे ऑइल टाकावे व वरती विद्युत बल्प लावल्याने मोठ्या प्रमाणात मुंगेरे मरतात. भविष्यात ऊस व इतर पिकाची नुकसान टाळता येईल हुमणीची आळी अवस्थाही सात ते आठ महिन्याचे असते की जे पिकाचे नुकसान करत असते याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season: दुष्काळात उसासाठी कारखान्यांची चढाओढ

Monsoon Forecast : पावसाचे अंदाज चुकले का? Weather Model आणि Synoptic Features मधला फरक समजून घ्या

Rural Power Supply Issue: महावितरणच्या कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा ठिय्या; सोमवारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास ‘टाळे ठोको’चा इशारा

Kharif Crop Loss: पावसाच्या खंडाने खरीप पिके संकटात

e-Crop Survey: ‘ई-पीक पाहणी’मुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

SCROLL FOR NEXT