Shaktipeeth Highway agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्ग विरोधात कोल्हापुरात उद्या शेतकरी निर्धार मेळावा

Farmers in Kolhapur : ५९ गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीने केले आहे.

sandeep Shirguppe

Shaktipeeth Highway Kolhapur : गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्ग हा शेतकरी शेती पर्यावरण व समाज उध्वस्त करणार आहे. तो मार्ग केवळ भांडवलदारांच्या विकृत डोक्यातील संकल्पना आहे. महामार्गाचा निर्णय हाणून पाडण्यासाठी, सर्व छोट्या-मोठ्या संघटना गटातटांचे एकत्रीकरण करून पुढील दिशा ठरवण्यासाठी ४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न होणार आहे. यास ५९ गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीने केले आहे.

४ एप्रिल रोजीच्या मेळाव्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, विधान परिषद गटनेते आ. सतेज पाटील, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष ॲड. हिरालाल परदेशी, डॉ. भारत पाटणकर,माजी आ. संपत बापू पाटील, माजी आ. के पी पाटील, माजी आमदार संजय बाबा घाटगे, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे, महादेव धनवडे, एम पी पाटील, गिरीश फोंडे,सम्राट मोरे यासह विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

२८ मार्चपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील ५९ गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हरकती प्रांताधिकरांच्याकडे जमा केले आहेत. निवडणूक सुरू असल्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या कडून इतर हालचाली नाहीत.

आंदोलनाची धार तेवत ठेवायचा निर्णय संघर्ष समितीने घेतला आहे. शक्तीपीठ महामार्गाचे गॅझेट नोटिफिकेशन म्हणजेच रस्ता करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT