Agriculture Management Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Management : शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध शेती करावी : आबिटकर

शासनातर्फे विविध जलसिंचन सुविधा पुरवल्या जात आहेत. सर्फनाला प्रकल्पाचे पाणीही यंदा अडवायचे आहे.

Team Agrowon

Kolhapur News : शेतकऱ्यांनी जे विकतेय ते पिकवायला हवे. बाजारपेठेची (Agriculture Market) माहिती घ्यायला हवी. कमी खर्चात अधिक उत्पादन (Agriculture Production) कसे मिळेल यासाठी प्रयत्न करावेत.

ढोर कष्टाची नको, नियोजनबद्ध शेती (Agriculture Management) करावी, असा सल्ला आमदार प्रकाश आबिटकर (MLA Prakash Abitkar) यांनी शेतकऱ्यांना दिला.

साळगाव (ता. आजरा) येथे स्व. सुशिलादेवी आनंदराव आबिटकर अॅग्रीकल्चर फाउंडेशन व कृषी विभागातर्फे एकरी साठ टन ऊस उत्पादकता (Sugarcane Productivity) वाढ अभियान व ऊस पीक स्पर्धा विजेत्यांचा बक्षीस समारंभ झाला. त्या वेळी आमदार आबिटकर बोलत होते.

जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अशासकीय सदस्य दताजीराव उगले, ऊस तज्ज्ञ डॉ. अंकुश चोरमुले व साळगावचे सरपंच धनंजय पाटील, अशोक फराकटे प्रमुख उपस्थित होते.

आबिटकर म्हणाले, की शासनातर्फे विविध जलसिंचन सुविधा पुरवल्या जात आहेत. सर्फनाला प्रकल्पाचे पाणीही यंदा अडवायचे आहे. बळीराजा कसा सुखी होईल, तसे त्याचे कष्ट कमी होतील यासाठी राज्य शासन धडपडत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे हा कार्यक्रम आहे.

शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेती सूत्रबद्धपद्धतीने करावी. वन्यप्राणी, गवे यांच्या बंदोबस्तासाठी व बांबूवर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT