Vilas Shinde, President of Sahyadri Farmers Producers Company Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Update : कृषी पदवीधरांवर शेतकऱ्यांची जबाबदारी

Vilas Shinde, President of Sahyadri Farmers Producers Company : मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आहे. शेती सोडून नोकरी, व्यवसायात त्यांना रस आहे. शेतीचे प्रश्न शास्त्रीय आहेत. ते शास्त्रीय दृष्टिकोनातून सोडविण्यासाठी शेतकऱ्यांनी शास्त्रीय विचार केला पाहिजे.

माणिक रासवे : अॅग्रोवन वृत्तसेवा

Parbhani News : मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये नैराश्य आहे. शेती सोडून नोकरी, व्यवसायात त्यांना रस आहे. शेतीचे प्रश्न शास्त्रीय आहेत. ते शास्त्रीय दृष्टिकोनातून सोडविण्यासाठी शेतकऱ्यांनी शास्त्रीय विचार केला पाहिजे.

मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबातील कृषी पदवीधरांवर शेतकरी समाजाला उभारी देण्याची जबाबदारी आहे. मराठवाड्यात कार्व्हर सारखे शेतकरी तयार झाले पाहिजेत, असे प्रतिपादन नाशिक येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये सुरू असलेल्या भारतीय कृषी अभियंता सोसायटी(इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चरल इंजिनिअर्स) ५८ व्या वार्षिक अधिवेशनात बुधवारी (ता. १३) दुपारी ‘मराठवाड्यातील शेती संधी व आव्हाने’ या विषयावर शिंदे बोलत होते.

अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रो. डॉ. इंद्र मणी मिश्रा होते. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, भारतीय कृषी अभियंता सोसायटीचे अध्यक्ष डॉ. एस. एन. झा, कुमार बिमल,शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. के. एस. बेग, डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव संतोष वेणीकर, डॉ. स्मिता सोलंकी, डॉ. कैलास डाखोरे, डॉ. प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले की, कृषी अभियंत्याचे शेतकऱ्यांच्या प्रगतीत मोठे योगदान आहे. मराठवाड्यातील सोयाबीन व कापूस शेती करण्याची पद्धती व्यावसायिक नाही. पांरपरिक पद्धतीमुळे नुकसान होत आहे. सोयाबीन व कापूस शेतीत जागतिक स्तरावर भारतीय शेतकरी टिकू शकत नाही. अमेरिकेत आपल्यापेक्षा चारपट जास्त उत्पादकता आहे. यांत्रिकीकरणामुळे उत्पादन खर्चही कमी लागतो.

शेती परवडत नाही म्हणून सरकारविरुद्ध शेतकऱ्यांचा असंतोष आहे. शेती व राजकारणाची गल्लत करू नये. शेतीकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. एकरी नफा वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले तर शेतीतून समृद्धी येईल.

डॉ. इंद्र मणी म्हणाले, की शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. डॉ. झा म्हणाले, की शेतकऱ्यांना पेरणी ते काढणी तसेच काढणी पश्चात तंत्रज्ञान देण्यात कृषी अभियंते निपुण असतात. त्यासाठी कृषी अभियंता असे केडर तयार करावे लागले. पंचायत ते जिल्हा स्तरावर कृषी अभियंत्याची पदस्थापना करण्याची गरज आहे. या वेळी मराठवाड्यातील राज्य शासनाचे पुरस्कारप्राप्त तसेच पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement Center : कोरेगावात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

Sugarcane Farming : शाहूवाडी परिसरात खुंटली आडसाली उसाची वाढ

Dairy Farming : दुग्ध व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याचा मोठा आधार

Water Crisis : ‘मोरणे’चे पात्र पडू लागले कोरडे

Achalpur APMC : अचलपूर बाजार समिती देणार व्यापाऱ्यांना ओळखपत्र

SCROLL FOR NEXT