Farmers Protest  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Protest : ‘डब्लूटीओ’विरोधात बळिराजाचा एल्गार

World Trade Organization : कृषी क्षेत्राला जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्लूटीओ) कक्षेतून बाहेर काढण्याची मागणी करत पंजाब आणि हरियानातील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २६) महामार्गांवर ठिकठिकाणी आंदोलन केले.

Team Agrowon

Farmers Protest Update : कृषी क्षेत्राला जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्लूटीओ) कक्षेतून बाहेर काढण्याची मागणी करत पंजाब आणि हरियानातील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २६) महामार्गांवर ठिकठिकाणी आंदोलन केले. या वेळी महामार्गांच्या दुतर्फा ट्रॅक्टर आणि अन्य वाहने उभी करण्यात आली होती.

सध्या पंजाब-हरियानाच्या खानौरी आणि शंभू सीमेवर हजारो शेतकरी आंदोलक ठाण मांडून बसले असून पिकांनी हमी भाव दिला जावा, अशी त्यांची आग्रही मागणी आहे. या शेतकऱ्यांनी दुपारी बारा ते तीन या वेळेत ‘डब्लूटीओ छोडो’ अशी घोषणा देत आंदोलन केले.

पंजाबमधील शेतकऱ्यांनी जालंधर-जम्मू महामार्गावर वाहने उभी केली होती. येथे दोबा किसान समितीचे प्रदेशाध्यक्ष जंगवीरसिंह चौहान यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले. शेतकऱ्यांनी तांडा येथील बिजली घर चौकामध्ये वाहने उभी केली होती. ‘डब्लूटीओ’चे धोरण हे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

किमान हमी भावाच्या अंमलबजावणीबरोबरच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अमृतसरमध्ये अंजाला, जंदियाला गुरू, आणि बियास महामार्गांभोवती शेतकऱ्यांनी वाहने उभी केली होती.

लुधियाना-चंडीगड महामार्गाच्या शेजारी देखील वाहने उभी करून ‘डब्लूटीओ’चा निषेध करण्यात आला. हरियानात पन्नास ठिकाणांवर शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT