Indian Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Agriculture : ‘वाघबारसे’च्या निमित्ताने शेतकऱ्यांची निसर्गाला प्रार्थना

Agriculture News : रानातील शेतपीक कापून घरी आणल्यानंतर शेतकरी आपले पशुधन चरण्यासाठी मोकळे सोडतात. हिंस्र श्वापदांपासून पशुधनाचे संरक्षण व्हावे यासाठी कोकणात वाघबारस साजरी केली जाते.

Team Agrowon

Ratnagiri News : रानातील शेतपीक कापून घरी आणल्यानंतर शेतकरी आपले पशुधन चरण्यासाठी मोकळे सोडतात. हिंस्र श्वापदांपासून पशुधनाचे संरक्षण व्हावे यासाठी कोकणात वाघबारस साजरी केली जाते. पूर्वापार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे मंडणगड तालुक्यात गावोगावी शेतकऱ्यांनी निसर्गदेवतेची आराधना करून पशुधनाचे रक्षण करण्याची निसर्गाला प्रार्थना केली. त्यातून निसर्ग आणि मानव याचे नाते अधोरेखित होते.

वाघबारसेच्या दिवशी १३ नोव्हेंबरला मोठ्या श्रद्धेने तालुक्यातील अनेक गावांतून ही परंपरा जोपासण्यात आली. काळाच्या ओघात ही प्रथा आता लोप पावत असली तरीही ग्रामीण भागात आजही तेवढ्याच आस्थेने जपली जाते. ग्रामीण भागात बिबटे आढळून येतात. पूर्वी बहुसंख्य शेतकऱ्यांकडे पशुधन असल्याने निगराणीसाठी गुराखी असत.

काळाच्या ओघात पाळीव जनावरांशी निगडित असणारे पारंपरिक कार्यक्रम विस्मरणात गेले असले तरी ही प्रथा आजही जपली जाते. वाघबारसच्या आदल्या दिवशी गुराखी, पुजारी गावातील प्रत्येक घरातून तांदूळ, गूळ व थोडे पैसे गोळा करण्यात आले.

वाघबारसला गावातील पशुधन रानातील एका गोठणीवर एकत्र आणण्यात आली. नदीतील दगड उगाळून रंगरंगोटी करून मुलांना वाघ म्हणून सजवले गेले. गुराखी, शेतकऱ्यांनी नवीन काठीला रंगवले. सर्व काठ्या एकत्रित एका ठिकाणी उभ्या करून पूजा करण्यात आली.

सजवलेल्या वाघांना पळायला लावून त्यांच्या पाठीवर पिशवीत जमवून आणलेली कडू कारटी शेतकऱ्यांनी आरोळी देत फेकून फोडली. वाघ रे वाघ रे, म्हणत या प्रतीकात्मक वाघांना वेशीच्या बाहेर पळवून लावण्यात आले. वेस ओलांडल्यानंतर पुन्हा माघारी फिरून वाघ धावत येऊन त्या काठ्यांना हाताने धक्का मारून खाली पाडत पाणवठ्याकडे पाणी पिण्यासाठी निघून जातात, असा खेळ रंगला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Market : पुसद बाजार समितीत चोवीस हजार क्विंटल सोयाबीन खरेदी

Agriculture Irrigation : ‘धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी आवर्तने सोडा’

Agriculture Department : दोन महिन्यांत अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करा

Farm Pond : धाराशिवला दहा वर्षांत उभारली ४ हजार २६२ शेततळी

Tree Cutting Tender : हजारो झाडांचा अवघ्या दीड लाखाला सौदा

SCROLL FOR NEXT