Jalgaon Apmc Election
Jalgaon Apmc Election Agrowon
ॲग्रो विशेष

Jalgaon Apmc Election : बाजार समिती निवडणुकीसाठी 'मविआ'चा मेळाव्यातून शेतकरी, मतदारांच्या संपर्कावर भर

Team Agrowon

Jalgaon Apmc Election Update : खानदेशात २१ बाजार समित्यांच्या निवडणुकीसंबंधीच्या (Market Committee Election) प्रचारात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सुरवात केली आहे. धुळ्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या उपस्थितीत मेळावा झाला आहे.

युती किंवा सेना-भाजपनेदेखील मेळाव्यांचे आयोजन केले आहे. मेळाव्यांद्वारे मतदार, शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यावर नेते, उमेदवारांनी भर दिला आहे.

धुळ्यातील मेळाव्यात माजी मंत्री थोरात यांनी युतीवर निशाणा साधला. शेतकरी हितासाठी महाविकास आघाडीला कौल द्या. सत्ताधारी संधी साधतात, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत वेळ मारून नेतात, अशी टीका थोरात यांनी केली.

या वेळी काँग्रेसचे नेते कुणाल पाटील व इतर समर्थक उपस्थित होते. जळगावातही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपापल्या कार्यालयांत विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या, ग्रामपंचायतीच्या सदस्यांशी संपर्क सुरू केला आहे. थेट प्रचार यातून साध्य केला जात आहे.

युतीचा मात्र कुठेही मेळावा झालेला नाही. नंदुरबारात पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांच्यावर धुरा आहे. त्यांनी मतदारांशी संपर्क सुरू केला आहे. जळगाव जिल्ह्यात मात्र युतीचे पॅनल निश्चित झालेले नाहीत.

धुळ्यात परिवर्तन पॅनल तयार

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजप व बाळासाहेब भदाणे गट यांच्यात युती झाल्याची घोषणा करण्यात आली. युतीतर्फे परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढली जाणार आहे. खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजपचे प्रमुख पदाधिकारी व बाळासाहेब भदाणे व त्यांच्या सहकाऱ्यांची चर्चा झाली.

चर्चेअंती भाजप व भदाणे गट यांच्यात युती झाल्याचे जाहीर करण्यात आले. खासदार डॉ. भामरे, सुभाष देवरे, माजी मंत्री विजय नवल पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, गजानन पाटील, मनोहर भदाणे, प्रा. अरविंद जाधव, संजय शर्मा, प्रभाकर पाटील, रामकृष्ण खलाणे हे नेतृत्व करतील. पुढील दिशा ठरविण्यासाठी मतदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा १२ एप्रिलला मेळावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

जळगावात ५१२ मतदारांना दिलासा

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी मतदारसंघातील ६१२ पैकी ५१२ मतदारांना मतदार यादीतून वगळण्याचा जिल्हा उपनिबंधकांचा निर्णय उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने रद्द केला आहे.

त्यामुळे ३० एप्रिल रोजी होणाऱ्या जळगाव बाजार समितीच्या निवडणुकीत आता सर्व मतदारांना मतदान करता येणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

जळगाव बाजार समितीसाठी २० मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील व्यापारी मतदारसंघातील ६१२ पैकी ५१२ मतदारांवर शशिकांत बियाणी व नितीन बेहडे यांनी आक्षेप घेतला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update : खुशखबर ! मॉन्सून ३१ मे पर्यंत केरळात होणार दाखल

Loksabha Election 2024 : कोण निवडून येणार? आकडेमोडीत गुंतले कार्यकर्ते

Crop Damage : माळीनगरची पिके पाण्याअभावी होरपळली

Pre Monsoon Rain : देवळा तालुक्यात वादळी पावसाने दाणादाण

Agriculture Funds : कृषी योजनांतून ३७ कोटींवर निधी खर्च

SCROLL FOR NEXT