Kharif Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : पावसाच्या हुलकावणीने नांदेडमध्ये पेरण्या अडचणीत

Kharif Season 2025 : मागील बारा ते पंधरा दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील खरीप पेरण्या अडचणीत आल्या आहेत.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : मागील बारा ते पंधरा दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील खरीप पेरण्या अडचणीत आल्या आहेत. काहींनी सोशल मीडियावर हवामानाचा अंदाज सांगणाऱ्या तथाकथित हवामान शास्त्रज्ञावर विश्‍वास ठेवून पेरणी केली. परंतु पेरलेल्या सोयाबीन, कपाशी, उडीद, मूग आदी पिकांची वाढ खुंटली आहे. तर काही ठिकाणी बियाणे उगवले नसल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

नांदेड जिल्ह्यात मेमध्ये झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने नदी-नाले एक झाले होते. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने जमिनीत भरपूर ओलावा झाला होता. यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा पावसाने जोर दिसून आला. या पावसाने शेतकऱ्यांनी हळद, कपाशीची लागवड सुरू केली.

यानंतर झालेल्या हलक्या पावसामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी आदी पिकांची पेरणी सुरू केली. परंतु या काळात पावसाने उघडीप दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या थांबविल्या. तर काही शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर पेरण्या सुरू ठेवल्या.

अशात मागील बारा ते पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. परिणामी पेरणी केलेले बियाणे काही ठिकाणी उगवले नाही तर काही ठिकाणी उगवलेले बियाणे ऊन व वाऱ्यामुळे वाळत आहे.

काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा वापर सुरू करून पिकांना संरक्षित पाणी सुरू केले आहे. तर अनेक शेतकरी मात्र पावसाच्या आशेने आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. नांदेड जिल्ह्यात बुधवारपर्यंत (ता. १८) ३३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT